लॉकडाऊनमुळे एक पेग दारूसाठी वणवण होत असताना जालन्यात समोर आला धक्कादायक प्रकार

दीड महिन्यांची दारूची तलफ भागवण्यासाठी असाही धक्कादायक प्रकार

दीड महिन्यांची दारूची तलफ भागवण्यासाठी असाही धक्कादायक प्रकार

  • Share this:
    जालना, 07 मे : लॉकडाऊनमुळे एकीकडे एक पेग दारूसाठी दारुड्यांची वणवण होत असताना जालन्यात मात्र एसपींच्या वाचक शाखेनं सापळा रचून लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या वाहतूक होत असलेला तब्बल 14 लाखांचा विदेशी दारूचा साठा पकडला आहे. दरम्यान, सदर दारूसाठा एका बड्या राजकीय पुढाऱ्याच्या वरदहस्ताने जालन्यात आणला जात असल्याची चर्चा रंगली आहे. शहरातील मंठा चौफुली परिसरातून विदेशी दारूचा मोठा साठा अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन एक पिकअप टेम्पो (क्र. एमएच- 21, बीएच- 0684) जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीनं त्यांच्या कार्यालयातील वाचक शाखेच्या अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. यावेळी पोलिसांनी सापळा रचून सिंदखेड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यान पाठलाग करून हे वाहन पकडण्याचा प्रयत्न केला. कोरोना संकटात शास्त्रज्ञांनी केला धक्कादायक खुलासा, असाही होतो रोगाचा प्रसार मात्र, पोलिसांची गाडी पाहताच पिकअप (क्र. एमएच 21 बीएच 0684) चालकानं हे वाहन पुष्पकनगरमध्यं नेलं आणि वाहन सोडून पळून गेला. यावेळी पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये मोठा दारूसाठा पोलिसांच्या हाती लागला. मिळालेल्या माहितीनुसार, 14 लाखां ही दारूची किम्मत एमआरपीनुसार आहे पण लॉकडाऊनमध्ये त्याची डबल किमतीने विक्री होणार होती. 6 लाख 92 हजार 800 रुपयांची मॅकडोल नंबर-1 दारूचे 124 बॉक्स, 1 लाख 53 हजार 600 रुपयांचे ब्लेंडर्स प्राईड दारूचे 10 बॉक्स, 17 हजार 500 रुपयाचे 100 पायपर्स ब्लेंडर्स स्कॉच व्हिस्कीच्या 5 बॉटल्स, 5 हजार रुपयाची व्हाईट लेबल्स ब्लेंडर्स स्कॉच व्हिस्कीच्या 2 बॉटल्स, 11 हजार रुपयांच्या चिवास रिगल (12) ब्लेंडर्स स्कॉच व्हिस्कीच्या 5 बॉटल्स, असा एकूण 10 लाख 79 हजार रुपयांचा विदेशी दारूचा साठा आणि 4 लाख रुपये किमतीचे पिकअप टेम्पो असा 14 लाख 79 हजाराचा ऐवज जप्त केला आहे. ...तर कोरोना रुग्ण आणखी वाढतील, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर असं का म्हणाले राज? या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून ड्रायव्हरचा शोध घेण्याचं काम पोलीस अधिकारी करत आहेत. दरम्यान, हा अवैध विदेशी दारूचा साठा एका बड्या राजकिय पुढाऱ्याच्या वरदहस्ताने जालन्यात आणण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे याचाही तपास पोलीस घेत आहेत. संकलन आणि संपादन - रेणुका धायबर
    First published: