पाकिस्तानच्या 2 नाही तर 20 विमानांनी केला होता भारतात प्रवेश - सूत्र

पाकिस्तानच्या 2 नाही तर 20 विमानांनी केला होता भारतात प्रवेश - सूत्र

पाकिस्तानच्या 2 नाही तर 20 विमानांनी पाकच्या हद्दीत प्रवेश केला होता अशी माहिती आता समोर येत आहे.

  • Share this:

दिल्ली, 28 फेब्रुवारी : भारताच्या एअर स्ट्राईकनंतर 2 नाही तर तब्बल 20 पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दात प्रवेश केला होता, अशी माहिती आता 'न्यूज18'च्या सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी पहाटे भारतीय हवाई दलानं पाकच्या नाकावर टिच्चून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. त्यानंतर पाकिस्ताननं तब्बल 20 विमानांसह भारतीय हद्दीत प्रवेश करत लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण, यामध्ये त्यांना यश आलं नसल्याची माहिती आता सूत्रांनी 'न्यूज18'ला दिली आहे.

यावेळी भारतीय हवाई दलानं दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकचं एफ - 16 हे विमान पाडलं गेलं. तर, पाकच्या विमानाचा पाठलाग करताना मिग - 21 विमान क्रॅश झाल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं. सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण असून अभिनंदन यांना सोडण्याची मागणी भारतानं केली आहे.

पाकिस्तानची दर्पोक्ती

पुलावामा हल्ल्यानंतर भारतानं जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या तळांना लक्ष्य केलं. त्यानंतर पाकिस्ताननं देखील जशास तसे उत्तर देण्याची दर्पोक्ती केली होती. पण, भारताचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर मात्र पाकिस्ताननं चर्चेसाठी हात पुढे केला आहे.

पाकिस्तानचा दबाव भारताने धुडकावला, पायलटच्या सुटकेसाठी तडजोड नाही

आभिनंदनचे वडील काय म्हणाले?

'अभिनंदनप्रति चिंता व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार. मी देवाला धन्यवाद देतो की, अभिनंदन सुखरूप आहे. तो जखमी नाही. शिवाय, तो अत्यंत हुशारीनं एका सैनिकाला शोभेल अशा पद्धतीनंच बोलत आहे. आम्हाला त्याचावर गर्व आहे. त्याचा छळ न होता तो सुखरूप देशात परत येईल हीच अपेक्षा. देशवासियांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल आम्हाला ऊर्जा मिळत आहे.अशा शब्दात अभिनंदन याचे वडिल माजी एअर मार्शल एस. वर्द्धमान यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

पाकचा प्रस्ताव भारतानं धुडकावला

अभिनंदनच्या सुटकेसाठी भारतासोबत तडजोड करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. मात्र , भारताने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न आणि दबाव धुडकावून लावले आहेत. अभिनंदनची कुठल्याही अटींशिवाय तात्काळ सुटका करा असं भारताने पाकिस्तानला बजावले आहे.

VIDEO : फोनवर आई म्हणाली, He Is No More माझा मुलगा देशाच्या कामी आला

First published: February 28, 2019, 4:02 PM IST

ताज्या बातम्या