S M L

गृहमंत्री झालो तर सर्व विचारवंतांना फासावर लटकवीन - कर्नाटकच्या भाजप आमदाराचं बेताल वक्तव्य

`मी गृहमंत्री झालो तर सर्व विचारवंत आणि बुद्धिवादी पुरोगामी व्यक्तींना गोळी मारण्याचे आदेश देईन'

Updated On: Jul 26, 2018 08:52 PM IST

गृहमंत्री झालो तर सर्व विचारवंतांना फासावर लटकवीन - कर्नाटकच्या भाजप आमदाराचं बेताल वक्तव्य

डी.पी.सतिश, बंगळुरू, ता.26 जुलै : मी गृहमंत्री झालो तर सर्व विचारवंत आणि बुद्धिवादी पुरोगामी व्यक्तींना गोळी मारण्याचे आदेश देईन असं अत्यंत बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्य कर्नाटकमधले भाजपचे जेष्ठ आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यांनी केलं आहे. त्यांचा हा बेतालपणा इथेच थांबला नसून सर्व पुरोगामी मंडळी ही राष्ट्रद्रोही आहेत, त्यांना फासवारच लटकवलं पाहिजे असंही ते म्हणाले. कारगील विजय दिना निमित्त विजयपूरा या आपल्या मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. देशातले विचारवंत हे काश्मीर मधल्या दहशतवाद्यांपेक्षाही धोकादायक आहेत अशी मुक्ताफळही त्यांनी उधळली.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे काश्मीर समस्येला जबाबदार असून त्यांच्यामुळेच काश्मीर जळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काश्मीर संबंधातलं 370 वं कलम काढून टाकतील अशी वल्गनाही त्यांनी केली. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे माध्यम सल्लागार दिनेश अमिन मट्टू यांच्या वक्तव्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. गरीबी आणि मृत्यूच्या दाढेतून वाचण्यासाठी लष्करात भरती व्हा असं त्यांनी म्हटलं असा दावाही त्यांनी केला.

  • गृहमंत्री झालो तर सर्व विचारवंत आणि बुद्धिवादी, पुरोगामी व्यक्तींना गोळी मारण्याचे आदेश देईन

Loading...

  • देशातले विचारवंत हे काश्मीर मधल्या दहशतवाद्यांपेक्षाही धोकादायक

  • सर्व पुरोगामी मंडळी ही राष्ट्रद्रोही आहेत, त्यांना फासवारच लटकवलं पाहिजे

  • देशात दहशतवाद आणि असंतोष वाढण्याला मानवाधिकाराचा पुरस्कार करणारे जबाबदार

देशात दहशतवाद आणि असंतोष वाढण्याला मानवाधिकाराचा पुरस्कार करणारे जबाबदार आहेत असं वक्तव्यही त्यांनी केलं. पाटील हे भाजपचे अनेक वेळ आमदार राहिलेले आहेत. तसेच त्यांनी भाजप सोडून जनता दल धर्मनिरपेक्ष आणि एकदा अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवली होती. 1994 ते 1999 या काळात ते भाजपचे आमदार होते आणि 2009 मध्ये ते बिजापूरमधून लोकसभेवर निवडणूनही गेले होते. 2002 ते 2004 या काळात ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्रीही होते.

पाटील यांच्या बेताल वक्तव्यावर चौफेर टीका होत आहे. आपल्या भडक आणि चिथावणीखोर भाषणाबद्दल त्यांची ख्याती असून या आधीही त्यांनी अनेकदा भडक वक्तव्य दिली आहेत. देशात भाजपच्या नेत्यांमध्ये आक्षेपार्ह विधान करण्याची लाटच आली असून या आधीही अनेक आमदार आणि खासदारांनी अशी विधानं केली आहेत.

हेही वाचा...

VIDEO : व्हायरल झालेल्या 'त्या' पोलिसाच्या फोटोची दुसरी बाजू !

सेनेचे खासदार खैरेंची आर्थिक मदत सोनवणे कुटुंबियांनी नाकारली!

काश्मीर प्रश्नावर भारताशी चर्चेस तयार - इम्रान खान

'भारतीय माध्यमांनी 'व्हिलन' बनवलं', इम्रान खानच्या पहिल्याच पत्रकार परिषदेतल्या 10 महत्वाच्या गोष्टी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 08:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close