VIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन

VIDEO VIRAL- मॅरेथॉनमध्ये धावताना फ्रॅक्चर झाला पाय, रक्ताळलेल्या गुडघ्यांवर चालत दिली बॅटन

तिने स्पर्धा सोडली नाही. ती हळू हळू धावत राहिली, पण....

  • Share this:

जपानच्या १९ वर्षीय रेई इडिया या अथलीटचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या धावपटूने इकिडेन कॉरपोरेट मॅरेथॉन रिलेमध्ये भाग घेतला होता. पण, जेव्हा तिला स्वतःच्या वाटणीचं ३.५४ किमी अंतर कापणं बाकी होतं, तेव्हा ती धावताना पडली आणि फ्रॅक्चर झाली.

यानंतरही तिने स्पर्धा सोडली नाही. ती हळू हळू धावत राहिली. पण जेव्हा २१३ मीटर अंतर राहिले होते, तेव्हा आणखीन धावणं तिला शक्य नव्हतं. तिच्या पायांनी उत्तर दिलं होतं. शेवटी ती गुडघ्यांवर ओणवी राहून रांगत पुढे जायला लागली. तिच्या गुडघ्यामधून आणि हातातून रक्त वाहत होतं. पण रेई इडियाने न थांबता आपली रेस पूर्ण केली.

दरम्यान, रेईला तिच्या इतर साथिदारांनी स्पर्धा सोडण्याचा निर्णय घ्यायला सांगितला होता. मात्र तरीही रेईने आपल्या जिद्दीने ती स्पर्धा पूर्ण केली. यानंतर तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले. या दुखापतीतून रेईला पूर्ण बरं व्हायला किमान चार महिने लागतील असे डॉक्टर म्हणाले.

First published: November 13, 2018, 12:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading