दिवाकर रावतेंच्या हस्ते काल तूर खरेदी केंद्राचं उद्घाटन, आज टाळं !

दिवाकर रावतेंच्या हस्ते काल तूर खरेदी केंद्राचं उद्घाटन, आज टाळं !

. काल मोठा गाजावाजा करत पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते तूर खरेदी सुरू करण्यात आली खरी पण दुसऱ्याच दिवशी तिथे कुलूप पाहण्यास मिळालंय.

  • Share this:

01 मे : उस्मानाबादमध्ये प्रशासनाचा तूर खरेदीचा ढोंगीपणा पुन्हा  एकदा उघड झाला आहे. काल मोठा गाजावाजा करत पालकमंत्री  दिवाकर रावते यांच्या हस्ते तूर खरेदी सुरू करण्यात आली खरी पण दुसऱ्याच दिवशी तिथे कुलूप पाहण्यास मिळालंय.

या ना त्या कारणांमुळे बंद पडलेले तूर खरेदी केंद्र अखेर सुरू झाले आहे. जिल्ह्यातील कळंब येथे दिवाकर रावते यांच्या हस्ते मोठा   22 तारखेपासून बंद असणारे तूर खरेदी केंद्र कळंब शहरात सुरू करण्यात आले. मात्र प्रशासनाने हा तामजांम केवळ पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते तूर खरेदी केंद्र सुरू करून मंत्री महोदयाच्या शाबासकीसाठी केल्याचं उघड झाले आहे.

काल ज्या खरेदी केंद्राचे उद्घाटन रावते यांच्या हस्ते झालं त्या ठिकाणी आज कुलूप पाहण्यास मिळत आहे. एवढंच नाही तर जिल्ह्यातील 9 ठिकाणची तूर खरेदी केंद्र ही आज बंदच आहेत.

First published: May 1, 2017, 5:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading