भारताच्या गुनीत मोंगाच्या ‘पीरियड- एंड ऑफ सेंटेंस’ लघुपटाला मिळाला OSCAR

भारताच्या गुनीत मोंगाच्या ‘पीरियड- एंड ऑफ सेंटेंस’ लघुपटाला मिळाला OSCAR

ग्रामीण भागात महिलांच्या मासिक पाळीमुळे होणाऱ्या समस्या या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. याच पार्श्वभूमीवर ‘पीरियड- एंड ऑफ सेंटेंस’ने इतिहास रचला आहे.

  • Share this:

मुंबई, २५ फेब्रुवारी २०१९- ग्रामीण भागात महिलांच्या मासिक पाळीमुळे होणाऱ्या समस्या या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. याच पार्श्वभूमीवर ‘पीरियड- एंड ऑफ सेंटेंस’ने इतिहास रचला आहे. या लघुपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट’ प्रकारात ऑस्कर पुरस्कार मिळाला. सिनेमाचं दिग्दर्शन रायका जेताबची यांनी केलं होतं तर गुनीत मोंगा यांनी लघुपटाची निर्मिती केली आहे.

बाओ (Bao) सिनेमाने एनिमल बिहेविअर, लेट अफटरनून सिनेमांना मागे सोडत बेस्ट एनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला. तर स्पायडरमॅन- इन टू द स्पायडर- वर्सेने इनक्रेडिबल २, आइसले ऑफ डॉग्ज सिनेमांना मागे टाकत बेस्ट एनिमेटेड फिचर कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्कार जिंकला

तर फॉरेन फिल्म लँग्वेज प्रकारात मॅक्सिकोत्या रोमा सिनेमाला ऑस्कर मिळाला. याच सिनेमाला बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कारही मिळाला होता. ग्रीन बुक सिनेमातील सर्वोत्कृष्ट अभिनयाबद्दल अमेरिकन अभिनेता मेहरशला अलीला सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

VIDEO : नदीत बंधारा म्हणून अमित शहांना बसवणार का?, राज ठाकरेंचा टोला

First published: February 25, 2019, 10:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading