यूक्रेनच्या नतालियाच्या शरीरात धडधडतंय रवीचं हृदय...ब्रेनडेड मुलाच्या आईबाबांची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

2017 मध्ये रवी एका अपघातात ब्रेन डेड झाला. त्यानंतर त्याचं हृदय यूक्रेनच्या नतालियाला देण्यात आलं. आता दोन वर्षांनी नतालियाने रवीच्या आईबाबांना यूक्रेनला बोलावून घेतलं तेव्हा त्यांनी रवीच्या ह्रदयाची धडधड ऐकली. त्यांची ही कहाणी खरंच मन हेलावून टाकणारी आहे.

  • Share this:

सुरतमध्ये 2017 ला रवीचा अपघात झाला. त्यानंतर त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आलं. यानंतर रवीच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. यानंतर रवीचं हृदय मुंबईच्या हॉस्पिटलध्ये असलेल्या यूक्रेनच्या नतालियाला देण्यात आलं.

रवीचे आईबाबा त्याच्या अंत्यसंस्कारानंतरच्या विधींमध्ये व्यग्र होते तेव्हा नतालिया यूक्रेनला गेली. त्यामुळे त्यांना ती भेटू शकली नाही. पण 2 वर्षांनी त्यांना तिने यूक्रेनला बोलवलं. तिथे येण्यासाठी त्यांना तिने तिकीटही पाठवलं.

यूक्रेनची नतालिया आमोलचुक आता रवीच्या आईबाबांनाच आपले आईबाबा मानते. रवीची आई लीलाबेन आणि वडील ठाकरसी भाई यांच्यासोबत नतालियाने आनंदात यूक्रेनची सफर केली.

नतालियाच्या शरीरात धडधडणाऱ्या ह्रदयाचे ठोके ऐकून रवीचे आईबाबाही सुखावत होते. या हृ्दयरोपणामुळे नतालियाला नवं आयुष्य मिळालं याचं त्यांना समाधान आहे.

रवीचं हृ्दय, लिव्हर, डोळे असे अवयव दान करण्यात आले. रवीने जाताजाता 5 जणांना नवं आयुष्य दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 07:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...