लग्नात डान्सर तरुणीवर झाडली गोळी, घटनेचा VIDEO मोबाईलमध्ये कैद

लग्नात डान्सर तरुणीवर झाडली गोळी, घटनेचा VIDEO मोबाईलमध्ये कैद

शनिवारी रात्री मऊ पोलिस स्टेशनच्या टिकरा गावप्रमुखाच्या मुलीच्या लग्नात महिलांचे नृत्य आणि गाणं सुरू होतं. तेवढ्यात एक माथेफिरू स्टेजवर चढला आणि त्याने गोळीबार सुरू केला.

  • Share this:

चित्रकूट(उत्तर प्रदेश), 06 डिसेंबर : एका युवकाच्या निष्काळजीपणाने भर लग्नसमारंभात शुकशुकाट झाला. शनिवारी रात्री मऊ पोलिस स्टेशनच्या टिकरा गावप्रमुखाच्या मुलीच्या लग्नात महिलांचे नृत्य आणि गाणं सुरू होतं. तेवढ्यात एक माथेफिरू स्टेजवर चढला आणि त्याने गोळीबार सुरू केला. यातील एक गोळी डान्स करणाऱ्या महिलेच्या उजव्या जबड्याला लागली.

हे प्रकरण चित्रकूट जिल्ह्यातील मऊ पोलिस स्टेशन परिसरातील टिकरा गावचे आहे. शनिवारी रात्री गावच्या प्रमुखांची मुलगी सपना हिचे लग्न होते. वऱ्हाडी आणि पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी वरपक्षाने हमीरपूर जिल्ह्यातील भरुआ शहरातील काही नर्तकांना आमंत्रित केले होते.

इतर बातम्या - हैदराबाद पोलिसांनी केलेला एन्काऊंटर संशयास्पद, उज्जव निकम यांची प्रतिक्रिया

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बाराच्या सुमारास हिना नावाची डान्सर महिला स्टेजवर आली आणि तिने 'ओय गोरिये.. गोली चल जाएगी' या गाण्यावर डान्स करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, कौशांबी जिल्ह्यातील एक युवक नाचत-नाचत स्टेजवर आला. त्याला अनेकांनी खाली येण्यासाठी सांगितलं पण इतक्यात अचानक त्याने बंदूक काढली आणि त्यातून 3 गोळ्या झाडला. यातील एक गोळी डान्सर हिनाच्या उजव्या जबड्याजवळ लागली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे.

इतर बातम्या - हैदराबाद एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह, पोलिसांविरोधात FIR दाखल करण्याची मागणी

ही घटना घडताच जखमी हिनाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु आता हिनावर लखनऊमध्ये उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक बलवंत चौधरी यांनी सोमवारी सांगितले की, "हिनावर लखनऊ येथे उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर आहे. युवकाने मद्यधुंद अवस्थेत गोळीबार केला आहे, तिची ओळख पटली असून अटकेसाठी पोलिस दल पाठवण्यात आलं आहे. " त्याचवेळी मऊ पोलिस स्टेशन सुभाषचंद्र चौरसिया यांनी सांगितले की, रविवारी वधूचा काका रामप्रताप याच्यावर तरूणाविरूद्ध खुनाचा प्रयत्न (कलम 7०7) दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या - हैदराबाद एन्काऊंटरमागे या IPS अधिकाऱ्याचा हात, त्यांनी सांगितलेली INSIDE STORY

Published by: Renuka Dhaybar
First published: December 6, 2019, 1:03 PM IST
Tags: hydrabad

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading