S M L
Football World Cup 2018

संघर्ष यात्रेसाठी विरोधक एसी बसमधून चंद्रपूरला रवाना

संघर्षयात्रेत सहभागी होणार्‍या नेत्यांनी बडेजाव टाळा, असे पक्षश्रेष्ठींकडून आदेश असतानाही विरोधी पक्षांचे आमदार एसी बसमधून चंद्रपुरात दाखल झाले आहेत.

Samruddha Bhambure | Updated On: Mar 29, 2017 12:51 PM IST

संघर्ष यात्रेसाठी विरोधक एसी बसमधून चंद्रपूरला रवाना

29 मार्च :  शेतकरी कर्जमाफीबाबत विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेला आज चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरू होणार आहे. संघर्षयात्रेत सहभागी होणार्‍या नेत्यांनी बडेजाव टाळा, असे पक्षश्रेष्ठींकडून आदेश असतानाही विरोधी पक्षांचे आमदार एसी बसमधून चंद्रपुरात दाखल झाले आहेत. शेतकऱ्याच्या कर्जमाफी वरून सरकारला वेठीस धरण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले आहेत.

सुरूवातीच्या दिवशीच यात्रेला हजर होण्यासाठी विरोधी पक्षातील बहुतांश सर्वच मंडळींनी ए.सी. मर्जिडीज बेन्झ बसमधून दाखल झाले. नागपूर ते चंद्रपूर असा गारेगार प्रवास विरोधकांनी अनुभवला. त्यामुळे विरोकांचा गारेगार प्रवास हा सध्या टीकेचा विषय ठरला आहे. स्वत: शेतकऱ्यांचे कैवारी समझणाऱ्या विरोधकांनी शेतकऱ्यांच्याच प्रवासासाठी इतका बडेजाव करण्याची गरजच काय असा सवाल आता उपस्थीत होत आहे.

दरम्यान, सत्ताधारी भाजपला एकटं पाडण्याचा विरोधकांचा डावा आहे. त्यासाठी सत्ताधारी शिवसेनेलाही सोबत घेण्याचा विरोधकांचा विचार आहे.

सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात आलेले अपयश, शेतकरी कर्जमाफीसाठी केला जाणारा वेळ काढूपणा आणि शेतकरी कर्जमाफीसाठी विधानसभेत संघर्ष करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १९ आमदारांचे निलंबन करण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याचाही उद्देश असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 29, 2017 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close