बाबा रामदेव सरकारचे जावई आहेत का ?, विरोधकांचा फडणवीसांना खडा सवाल

बाबा रामदेव सरकारचे जावई आहेत का ?, विरोधकांचा फडणवीसांना खडा सवाल

पतंजलीची उत्‍पादने विकण्‍याच्‍या सरकारच्‍या निर्णयावर माजी मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. रामदेवबाबा सरकारचे जावई आहेत का ? असा सवाल करीत हे केंद्र सरकारच्‍या आदेशावरूनच होत असल्‍याचं म्‍हटलंय.

  • Share this:

22 जानेवारी, मुंबई : पतंजलीची उत्‍पादने विकण्‍याच्‍या सरकारच्‍या निर्णयावर माजी मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. रामदेवबाबा सरकारचे जावई आहेत का ? असा सवाल करीत हे केंद्र सरकारच्‍या आदेशावरूनच होत असल्‍याचं म्‍हटलंय. अलिबाग येथे कॉंग्रेस कार्यकर्त्‍यांच्‍या मेळाव्‍यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते . सरकारने नागपूरच्‍या मिहान प्रकल्‍पातील जागा रामदेव बाबा यांच्‍या पतंजलीला जवळपास फुकट दिली आहे . याला न्‍यायालयात आव्‍हान देणार असल्‍याचे पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी स्‍पष्‍ट केले.

पतंजलीवर सरकार मेहेनबान का ? - अजित पवार

बाबा रामदेव यांच्या पतंजलीची उत्पादनं आता राज्यातल्या ठिकठिकाणच्या आपलं सरकार सेवा केंद्रात मिळणार आहेत. सरकारनं काढलेलव्या परिपत्रकात याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय. या निर्णयामुळं राज्यातल्या कानाकोपऱ्यातील हजारो सेवा केंद्र पतंजलीला विक्रीसाठी फूकट वापरायला मिळणार आहे. विरोधकांनी सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध केलाय. सरकार पतंजलीवर मेहरबान का असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केलाय.

मग बचत गटांनाही संधी द्या- धनंजय मुंढे

राज्यात चार लाखांवर महिला बचतगट आहेत. या बचतगटांच्या मालाला हक्काचं विक्रीचं ठिकाण सरकार का देत नाही असाही विरोधकांचा आरोप आहे.

नागपूरच्या मिहानमधील जमीन देण्याचा निर्णय वादात सापडलेला असताना आता सेवा केंद्रही पतंजलीला आंदण देण्यात आलीयत. त्यामुळं बचतगटांतील लाखो महिला आणि तरूण उद्योजकांपेक्षा या सरकारला बाबा रामदेव प्रिय आहेत का? असा संतप्त सवाल विचारला जातोय.

First published: January 22, 2018, 6:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading