दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची महत्वाची बैठक

दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची महत्वाची बैठक

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी दिल्लीत विरोधकांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, सीपीआय नेते डी राजा, तारिक अन्वर, डी.पी. त्रिपाठी आणि प्रफुल पटेल या सगळ्यांची या बैठकीतला उपस्थित होते.

  • Share this:

29 जानेवारी, नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी दिल्लीत विरोधकांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सीपीआय नेते डी राजा, तारिक अन्वर, डी.पी. त्रिपाठी, शरद यादव  आणि प्रफुल पटेल या सगळ्यांची या बैठकीतला उपस्थित होते. दरम्यान, समाजवादी, आरजेडी आणि ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचा मात्र, एकही नेता विरोधकांच्या या बैठकीला हजर नव्हता, हे विशेष

केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांची भूमिका काय असेल यासंदर्भात अनौपचारीक चर्चा झाल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली. मुंबईत संविधान बचाओ रॅली काढण्यात आली त्याचवेळी आज बैठक होणार हे ठरले होते, असेही पटेल यांनी स्पष्ट केले. यापुढील बैठक सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. संविधान बचाओ रॅलीत शरद पवार, शरद यादव, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, तुषार गांधी, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला होता. यावेळीच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कसे घेरायचे याबाबत या बैठकीत रणनीती ठरवण्यात आली असेही समजते आहे.

शरद पवारांनी बैठकीआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्याचीही माहिती मिळतेय. लालूप्रसाद यादव तुरुंगात गेल्यानंतर शरद पवार आता पुन्हा एकदा विरोधकांची मोट बांधण्याची तयारी करताना दिसत आहेत. पण शरद पवारांची मोदींसोबतची मैत्री लक्षात घेता ममता बॅनर्जी, अखिलेश सिंह, लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाने मात्र, या बैठकीपासून तुर्तास लांब राहणेच पसंत केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2018 11:02 PM IST

ताज्या बातम्या