8 कारणांमुळे नवीन Oppo Reno 10 X हा हवाहवासा!

8 कारणांमुळे नवीन Oppo Reno 10 X हा हवाहवासा!

आपण DSLR च्या श्रेणीमध्ये येईल, दूरवरून आपल्याला स्पष्टता देईल आणि आपल्या सेल्फीजमुळे आपले फ्रेंडस जळतील असा स्मार्टफोन बघत आहात का? आता पुढे बघू नका, Oppo Reno 10 X झूमचे आगमन 28 मे रोजी झाले आहे!

  • Share this:

मुंबई, 30 मे : आपल्याला मागे- पुढे न वळता दूरवरून ग्रेट शॉटस घ्यायची इच्छा असेल, रात्री स्पष्टता हवी असेल, सर्वोत्तम सेल्फी हवी असेल आणि सुपर टेलिफोटोसह वाईड कॅमेरा लेन्सेस हवे असतील, तर आता कुठेच शोधू नका. नवीन Reno 10X हायब्रिड झूममध्ये असे ट्रिपल कॅमेरा सोल्युशन आहे ज्यामुळे आपल्याला काँसेर्टस, वाईल्डलाईफ सँक्च्युरी किंवा बीचवर नेहमी इच्छा असलेले दूरवरूनचे शॉटस घेता येतील. त्यासह ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन (ओआयएस) फीचर आहे ज्यामुळे आपल्याला रात्रीसुद्धा उच्च गुणवत्तेसह 10 X झूमफोटोज मिळतात!

परंतु केवळ ह्याच कारणांमुळे Reno 10 X हायब्रिड झूम हा इतका चांगला आहे असे नाही. इतर कारणे जाणून घेण्यासाठी त्याच्या आश्चर्यकारक वैशिष्ट्यांविषयी वाचा.

बिग स्क्रीनवरील मनोरंजन आता आपल्या खिशात

Reno 10X हायब्रिड झूममध्ये 6.6- इंचाचा अमोल्ड स्क्रीन आहे व तो सहाव्या पिढीच्या कॉर्निंग गोरिला ग्लासपासून बनलेला आहे व त्यामुळे पॅनोरॅमिक फुल स्क्रीन डिस्प्ले FHD रिझोल्युशनसह उपलब्ध होतो. तसेच, आपल्याला रिच कलर्स मिळतात, हानीकारक असलेला निळा प्रकाश कमी होतो आणि स्क्रीनच्या पॉवरमध्ये 8% ऊर्जा वाचते.

अधिक जलद आणि अधिक सुरक्षित

Renoच्या हिडन फिंगरप्रिंट अनलॉक 2.0 मध्ये फिंगरप्रिंट इमेजेस OLED सेल्फ लायटिंग फिचरद्वारे सेन्सरकडे रिफ्लेक्ट होतात व त्यामुळे फिंगरप्रिंटस ओळखता येतात व त्यासह स्क्रीन व बॉडी हा रेश्योसुद्धा मोठा मिळतो. हिडन फिंगरप्रिंट अनलॉक 2.0 ची स्पीड ही आधीच्या जनरेशनपेक्षा 20% ते 30% जास्त आहे आणि सध्या मार्केटमध्ये असलेले हे सर्वोत्तम स्क्रीन फिंगरप्रिंट अनलॉक आहे.

पातळ, दणकट आणि सुंदर

Renoची स्लीक बॉडी एक सीमलेस संरचना आहे व त्यामध्ये फोनमध्ये समोर किंवा मागे ओपनिंग नाही आहे. त्याचे रिअर कॅमेराज सहाव्या जनरेशनच्या कॉर्निंग गोरिला 3D ग्लास बॅकमध्ये झाकले जातील, अशीव्यवस्था आहे. ते मध्यभागामधून अरेंज केलेले आहेत व त्यामुळे ते वेगळे दिसत नाही. स्लीकनेससह Reno 10 X झूम तितकाच सुंदरही आहे.

एआयद्वारे सज्ज असलेली आश्चर्यकारक पिक्चर्स

कूल अल्ट्रा नाईट मोड 2.0 सह, Reno 10 X झूममध्ये आर्टिफिशियल इंटिलिजंस (कृत्रिम बुद्धीमत्ता AI), HDR व मल्टी फ्रेम नॉईज रिडक्शन आहे व त्यामुळे हातात धरताना स्टॅबिलायजेशन मिळते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण रात्री पोर्ट्रेट घेता, तेव्हा फोन पार्श्वभूमीवर असलेला मानवी चेहरा आपोआप ओळखतो आणि पोर्ट्रेटला विशेष संरक्षण देतो व त्यामुळे ते अधिक आकर्षक होते. त्याच्या डॅझल कलर मोडमुळे एआय वापरून स्क्रीनवरील रंगांना अचूक प्रकारे पुन: निर्माण करता येते व त्यामुळे फोटो अधिक जीवंत आणि नैसर्गिक येतो. आता आपण फोनच्या Oppo पोर्ट्रेट स्टाईलला वापरून मॅगझिन लेव्हल पोर्ट्रेटस बनवू शकता व त्यामुळे पोर्ट्रेटमध्ये ऑप्टिमायजेशन, रंग आणि लाईट इफेक्टसची एक अनुभूती मिळते.

आपली स्वत:ची हायटेक मूव्ही शूट करा

Reno 10 X झूममध्ये 4K व्हिडिओज 60 fps पर्यंत शूट करता येतात. तसेच मल्टीपल मायक्रोफोन्स वापरून 360 अंशातून आजूबाजूच्या आवाजांना रेकॉर्ड करण्यासाठी अनेक मायक्रोफोन्स वापरणा-या व अचुकपणे आवाज नोंदवून ते रिस्टोअर करण्यास सक्षम अशा ऑडिओ फोकस तंत्रज्ञानासह आपल्याला व्यावसायिक प्रकारच्या मूव्हिजची गुणवत्ता मिळते. आम्ही हे सांगितले का की त्यामध्ये स्टिरिओ स्पीकर्स डॉल्बी एटमोसही आहेत ज्यामुळे अतिशय इमर्सिव्ह साउंड एक्स्पिरियन्स आपल्याला मिळतो व ह्या सगळ्यामुळे फोन हा एक मूव्ही थिएटरच बनतो!

आपले फोटोज सगळ्यांपेक्षा वेगळे बनवा

Renoच्या 16MP एआय ब्युटी कॅमेरामध्ये समोरच्या बाजूला सॉफ्ट लाईट आहे व त्यामुळे कमी प्रकाशाच्या परिस्थितीत फोटो घेताना आपली त्वचा आणखी नैसर्गिक दिसते. बॅकलाईटसह शूट करण्यासाठीही त्यामध्ये सर्व व्यवस्था आहे व त्याद्वारे चेह-यावरील लाईट इफेक्टस योग्य होतात आणि बॅकलाईटसह शूट करताना सर्वोत्तम फ्लेअर मिळते, आणि चेहरा ग्रे होण्यासारख्या गोष्टींपासून आपल्याला अतिशय रिच असे लेयरिंग मिळते आणि स्पष्ट पोर्ट्रेटस आणि सीनरी कॅपच्युअर करता येते.

आतील क्षमता

Reno 10 X झूमला स्नॅपड्रॅगन चिपसेटद्वारे अपग्रेडेड VOOC 3.0 तंत्रज्ञानाद्वारे पॉवर दिली जाते व त्यामुळे दीर्घकाळ बॅटरी लाईफ मिळते आणि अद्ययावत L1 L5 ड्युअल फ्रिक्वेन्सी जीपीएससह अधिक अचूक पोजिशनिंग आणि नेवीगेशन मिळते. एका स्मूथ स्मार्टफोनमध्ये हव्या अशा ह्या सर्व बाबी इथे आहेत!

प्ले ऑन!

Reno सिरीजमध्ये गेम्स लक्षात घेऊन आखणी केलेली आहे व त्यामुळे गेम बूस्ट 2.0 च्या मदतीने उपलब्ध असलेल्या प्रत्येक संसाधनाचा वापर केला आहे. जर त्यामध्ये फ्रीझ वॉर्निंग असेल, तर त्याद्वारे आपोआप रिसोर्सेस अलोकेट होतात व त्यामुळे गेम फ्रेम रेट व स्थिरतेमध्ये सुधारणा होते.

जरी आपण सातत्याने गेम्स खेळत असलात, तरी Reno 10X झूम थ्री हीट डिसिपेशन पद्धतींमुळे फोनच्या तपमानाचे नियंत्रण होईल व तो ओव्हरहीट होणार नाही.

रेमोच्या मल्टी मायक्रोफोन नॉईज रिडक्शन तंत्रज्ञानामुळे आपल्याला व्हॉईस कॉलमधला किंवा स्क्रीनवरील टॅपिंगमुळे येणारा गोंगाट ऐकावा लागणार नाही, ह्याची खात्री मिळेल. त्याशिवाय आपल्याला गेम सीन्सनुसार विविध वायब्रेशन इफेक्टस बनवणा-या Renoच्या लिनियर मोटरमुळे अधिक वास्तविक गेमिंग एक्स्पिरियन्स मिळेल.

ह्या फोनचा शुभारंभ 28 मे रोजी झाला, परंतु त्याच्या आधीच टेक लव्हर्समध्ये ह्याचे आकर्षण निर्माण झाले होते. कारण त्यामध्ये अतिशय बुद्धीमान कॅमेरा, पातळ व प्रिमियम फील आहे आणि असा प्रोसेसर आहे ज्यामुळे हा अतिशय स्मूथ अनुभव देतो! आपल्याला आणखी काय हवे असते?

First published: May 30, 2019, 11:39 AM IST
Tags: mobile

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading