Oppoच्या 'या' स्मार्टफोनमध्ये आहे 48MP चा कॅमेरा; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत

Oppoच्या 'या' स्मार्टफोनमध्ये आहे 48MP चा कॅमेरा; 'ही' आहेत फीचर्स आणि किंमत

Oppoने गेल्या महिन्यात लाँच केलेल्या स्मार्टफोनचं 'हे' पावरफुल व्हेरिएंटआहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 मे : Oppo या चीनच्या स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपनीने 48 मेगापिक्सलचा Oppo A9x हा स्मार्टफोन लाँच केला आहे. गेल्या महिन्यात लाँच झालेल्या Oppo A9 या फोनचं हे पावरफुल व्हेरिएंट आहे. या स्मार्टफोनची विशेषता त्याच्या 48 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यात आहे. तसंच 4,020mAh की बॅटरी आणि VOOC 3.0 हे फास्ट चार्जर देण्यात येत आहे.

Oppo A9x या स्मार्टफोनची किंमत 20,200 रुपये अशी असून, आइस झेड व्हाइट आणि ब्लॅक अशा दोन कलर ऑप्शनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने या स्मार्टफोनचं प्री-बुकिंग सुरू केलं आहे. Oppo A9 हा स्मार्टफोन जेव्हा लाँच झाला होता तेव्हा कंपनीने त्याची किंमत 18,700 अशी ठेवली होती.


हॉटस्पॉटचं इंटरनेट वापरणं होणार आणखी सोपं; बदलणार 'हे' नियम


Oppo A9x चे स्पेसिफिकेशन्स -

मोबाइलच्या डिझाइनबाबत सांगायचं झालं तर, नवा Oppo A9x हा तंतोतंत Oppo A9 साररखाच दिसतो. याच्या फ्रंट साइडला वाटरड्रॉप नॉच देण्यात आलं आहे आणि बॅक साइडला ड्युएल कॅमेरा सेटअप आणि फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलंय. हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाय बेस्ड ColorOS 6.0 वर चालतो. तर या स्मार्टफोनला 6.5-इंचाचा फुल-HD डिस्प्ले देण्यात आला आहे.


यात 6GB RAM आणि 128GB इंटरनल मेमोरी तसंच MediaTek Helio P70 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी उत्तम असा ड्युएल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून, त्यातला प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आणि सेकंडरी कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. तर सेल्फीसाठी फ्रंट साइटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात पोट्रेट मोड आणि कलरफुल मोड असे दोन ऑप्शन्स तुम्हाला मिळतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2019 02:42 PM IST

ताज्या बातम्या