कॅमेरा: आता बोलूया कॅमेराविषयी, OPPO A12 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 13 MP व दुसरा 2 MP क्षमतेचा आहे. तसेच याचा सेल्फी कॅमेरा 5 MP क्षमतेचा आहे. हा फोन 6x झूम व बर्स्ट मोड पेक्षा कमी आहे. यामध्ये देण्यात आलेला डॅझल कलर मोड पिक्सल ग्रेड कलर मॅपिंग अल्गोरिदमच्या मदतीने उत्तम छायाचित्रे टिपण्यासाठी सक्षम आहे. याच्या कॅमेरामध्ये AI ब्युटीफिकेशन फिचर आहे, जे परफेक्ट नॅचरल शॉट घेण्यास मदत करतो. उत्तम सिक्युरिटी: सुरक्षेच्या दृष्टीने पाहता, या फोनमध्ये याचाही विशेष विचार केला गेला आहे, युजरच्या सुंदर अनुभवावर लक्ष केंद्रित करून OPPO A12 च्या बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. एवढेच नाही तर यामध्ये AI फेशिअल अनलॉक चेही एक उत्कृष्ट फिचर दिले गेले आहे, जे फोन अत्यंत जलद गतीने अनलॉक करण्यास मदत करते. किमतीचा विचार करता या फोनचे 3GB+ 32GB व्हेरीयंट केवळ 9,990 रुपयांत उपलब्ध होईल तर 4GB+ 64GB व्हेरीयंट केवळ 11,490 रुपयांत उपलब्ध होईल. या फोनच्या खरेदीवर आपणास अनेक ऑफर्सचाही लाभ उठवता येईल. 21 जूनपर्यंत या फोनची खरेदी केली असता आपल्याला 6 महिन्याची एक्स्टेंडेड गॅरेंटी मिळेल. बँक ऑफ बडोदाच्या क्रेडीट कार्ड EMI व फेडरल बँकेच्या डेबिट कार्ड EMI द्वारे हा फोन खरेदी केला असता आपल्याला 5% कॅशबॅक मिळेल. तेच 6 महिन्यापर्यंतच्या क्रेडीट कार्ड EMI व डेबिट कार्ड EMI वर वर कोणतीही आकारणी लागू होणार नाही. तसेच, बजाज फिनसर्व, IDFC फर्स्ट बँक, होम क्रेडीट, HBD फायनांशिअल सर्विसेस व ICICI बँकेकडून काही जबरदस्त ऑफर्स देण्यात येत आहेत. एकुणात आपण असे म्हणू शकतो की, हा फोन आपल्यासाठी एक पैसा वसूल फोन सिद्ध होईल आणि या रेंजमध्ये उपलब्ध स्मार्टफोन्सच्या तुलनेमध्ये याची वैशिष्ट्ये याला सर्वोत्तम ठरवतात.Add an abstract edge to your style! Introducing the #OPPOA12, equipped with a Dual Rear Camera, 4GB RAM & 64GB ROM, 4230mAh Battery and many more features for you to explore. Sale starts from 10th June. Know more: https://t.co/zoFISXoIO8 pic.twitter.com/h3KCqyZKjO
— OPPO India (@oppomobileindia) June 8, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.