S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

दिग्विजय सिंग यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरिणीतून डच्चू ?

राष्ट्रीय सरचिटणीस असलेले दिग्विजय सिंग गोव्याचे प्रभारी असताना सर्वाधिक जागा जिंकूनही सरकार स्थापन करण्यात काँग्रेसला अपयश आल होतं.

Sachin Salve | Updated On: May 28, 2018 11:29 PM IST

दिग्विजय सिंग यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरिणीतून डच्चू ?

नवी दिल्ली, 28 मे : आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तवणुकीमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरिणीतून डच्चू देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

दिग्विजय यांच्याकडे असलेले आंध्र प्रदेशचे प्रभारीपद काढून घेण्यात आले असून त्यांच्याजागी केरळचे माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांना राहुल गांधी यांनी आंध्र प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्त केलंय.

राष्ट्रीय सरचिटणीस असलेले दिग्विजय सिंग गोव्याचे प्रभारी असताना सर्वाधिक जागा जिंकूनही सरकार स्थापन करण्यात काँग्रेसला अपयश आल होतं. तेव्हापासून काँग्रेस पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज होते. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेसाठी काही महिने सुटी घेऊन दिग्विजय सिंग पक्ष कार्यातून गायब झाले होते. आगामी मध्यप्रदेश निवडणुकीसाठी त्यांना वेळ देता यावा यासाठी इतर जबाबदाऱ्यातून त्यांना मुक्त केल्याचं काँग्रेसतर्फे सांगण्यात येत असल तरी दिग्गी राजा यांच्या काँग्रेसमधील स्थानाला उतरती कळा लागल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 28, 2018 11:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close