मालिकेत बहीण- भाऊ, खऱ्या आयुष्यात मात्र करतायेत एकमेकांना डेट

याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर तर होणार नाही ना अशी भिती निर्मात्यांना जाणवत होती.

News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2019 11:30 AM IST

मालिकेत बहीण- भाऊ, खऱ्या आयुष्यात मात्र करतायेत एकमेकांना डेट

छोटा पडदा अफेअर, ब्रेकअप, प्रेम आणि लग्न या सगळ्यामध्ये बॉलिवूडपेक्षा काही कमी नाही. मात्र छोटा पडदा याबाबतीत दोन पावलं पुढेच आहे. मालिकेत भावा- बहिणींची भूमिका साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत होते.

या अफेअरमुळे अनेक निर्माते अडचणीत आले होते. याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर तर होणार नाही ना अशी भिती निर्मात्यांना जाणवत होती. आज आम्ही तुम्हाला अशाच चार जोडप्यांबद्दल सांगणार आहोत जे रिल लाइफमध्ये भाऊ- बहीण होते. मात्र खऱ्या आयुष्यात ते एकमेकांना डेट करत होते.

‘ये रिश्ता त्या कहलाता है’ या प्रसिद्ध मालिकेत रोहन मेहरा आणि कांची सिंह हे दोन्ही कलाकार बहिण- भावाची व्यक्तीरेखा साकारत होते. मात्र पडद्यामागे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. याच कारणामुळे निर्मात्यांनी या दोघांनाही मालिकेतून काढून टाकलं.

Loading...

सात वर्षांपूर्वी २०१२ मध्ये स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका ‘एक वीर की अरदास वीरा’मध्ये दिगंगना सूर्यवंशीने मुख्य भूमिका साकारली होती. यात शिविन नारंगने तिच्या भावाची व्यक्तीरेखा साकारली होती. दोघ एकमेकांना डेट करत होते. यानंतर दिगंगनाने टीव्हीसृष्टीला अलवीदा म्हटलं आहे. अनेक महिन्यांनी ती बिग बॉसमध्ये दिसली होती.

‘ये है मोहब्बतें’ या प्रसिद्ध मालिकेत अदिती भाटिया आणि अभिषेक वर्मा या दोघांनी बहीण- भावाची व्यक्तिरेखा साकारली. मात्र आजही दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

२०१८ मध्ये ऑफ एअर गेलेली ‘तू सूरज में सांझ पियाजी’ मालिकेत रिया शर्मा आणि मयंक वर्मा यांनी पडद्यावर बहीण- भावाची व्यक्तिरेखा साकारली होती. शुटिंगदरम्यान दोघं एकमेकांसोबत खूप वेळ घालवायचे. तसंच शूटिंग संपल्यानंतरही दोघं अनेकदा बाहेर फिरायला जायचे. असं म्हटलं जायचं की दोघं एकमेकांना डेट करत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2019 11:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...