कायद्याचं पालन फक्त आम्हीच सांगायचं का?,कोर्टाने टोचले सरकारचे कान

कायद्याचं पालन फक्त आम्हीच सांगायचं का?,कोर्टाने टोचले सरकारचे कान

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : कायद्याचं पालन करण्यात राज्य सरकारला रस नाही, याचिकाकर्ते आणि हायकोर्टाचाच कायदा पालनाचा अट्टाहास असल्याचं म्हणत हायकोर्टानं राज्य सरकारचे कान टोचले आहेत. तपासणी न करताच अवजड वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देण्याच्या प्रकाराबद्दल कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

डेव्हिड हेडलीवर अमेरिकेतल्या तुरूंगात हल्ला, प्रकृती गंभीर

अवजड वाहनं चालवण्या योग्य आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची असा कोर्टाने सवालदेखील विचारला आहे. मुंबईत १७५ अवजड वाहनं आढळली होती. त्यातील केवळ १७ च नेमकी कोणती ती वाहनं आहेत याचा पत्ता लागलाय मग इतर वाहनं गेली कुठे असा सवाल हायकोर्टानं विचारला.

फिटनेस चाचणी न घेता सदोष वाहनं चालवली गेल्यास त्यामुळे वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे, याने जीवितहानी होऊ शकते याची कल्पना असूनही सरकार या गोष्टीकडे कानाडोळा का करतंय असा सवाल कोर्टानं विचारला.

VIDEO : अरे तो बुडतोय,पण काकासाहेबाला वाचावला कुणीच आलं नाही !

या सगळ्या कामासाठी आवश्यक असलेल्या अजून ३२० जागा अजून भरल्या नसल्याबद्दल कोर्टाने राज्य सरकारचे कान उपटले. पुण्यातील रहिवासी श्रीकांत कर्वे यांनी या संदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे.

First published: July 23, 2018, 9:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading