हॅलो, मी बँकेतून बोलतोयss असे सांगत क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा

हॅलो, मी बँकेतून बोलतोयss असे सांगत क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा

क्रेडिट कार्ड खरेदी केल्यानंतर कार्ड एक्टिव्हेशनच्या नावाने ग्राहकांना आले होते कॉल...

  • Share this:

प्रशांत बाग,(प्रतिनिधी)

नाशिक,20 नोव्हेंबर: आरबीएल (RBL)बँकेच्या 32 ग्राहकांना सुमारे 16 लाख रूपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रेडिट कार्ड खरेदी केल्यानंतर कार्ड एक्टिव्हेशनच्या नावाने ग्राहकांना कॉल आले होते. 10 दिवसांत 32 ग्राहकांची अशाप्रकारे फसवणूक करण्यात आली आहे. सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे सर्व्हर हॅक झाल्याचा ग्राहकांना संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

हॅलो, बँकेतून बोलतोयss,असे सांगून ओटीपी नंबर मिळवत हॅकर्सने नाशिक शहरातील आरबीएल बँकच्या क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा घातला. अज्ञातांनी कार्डच्या माध्यमातून 32 ग्राहकांच्या खात्यातील 16 लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने लांबवल्याचे समोर आले आहे. महेश विश्वनाथ मेखे (रा. पाइपलाइन रोड, आनंदवली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, महेश मेखे यांच्याकडे आरबीएल बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांना फोन आला होता. बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून भामट्याने त्यांचा विश्वास संपादन केला. संशयितांनी कार्डची आणि ओटीपी नंबरची माहिती मिळवली. त्यांच्या क्रेडिट खात्यावर डल्ला मारला. शहरात अशा अनेक ग्राहकांची अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहे.

नव्या जमान्याची ही बँक होणार बंद, तुमचे खाते असेल तर...

आयडिया पेमेंट बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक त्यांचा कारभार बंद करणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, रिझर्व्ह बँकेने आयडिया पेमेंट बँकेला आपला कारभार संपवण्यासाठीची परवानगी दिली आहे.

यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेने आपला कारभार संपवण्याची घोषणा केली होती. काही आकस्मिक घटनांमुळे हा निर्णय घ्यावा लागतो आहे, असे या बँकेने म्हटले होते. एप्रिल 2016 मध्ये आयडिया सेल्युलरने आयडिया मोबाइल कॉमर्स सर्व्हिसेस ही कंपनी पेमेंट बँकेत विलीन केली आणि त्याला आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक असे नाव दिले. आता ही पेमेंट बँक बंद झाल्यानंतर एअरटेल, पेटीएम, जिओ, इंडिया पोस्ट यासारख्या प्रमुख कंपन्यांची पेमेंट बँक सेवा उपलब्ध असेल.

20 जुलैला दिला होता संदेश

बँकेने आपल्या ग्राहकांना 20 जुलै 2019 रोजी एक संदेश दिला होता. जे पेमेंट बँकेचे ग्राहक आहेत त्यांनी आपला बॅलन्स लवकरात लवकर ट्रान्सफर करावा, असं बँकेने म्हटलं होतं. आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक17 महिन्यांच्या आधी एप्रिल 2016 मध्ये सुरू झाली होती. आदित्य बिर्ला नुवो आणि आयडिया सेल्युलर यांचा हा संयुक्त उपक्रम होता. यामध्ये आदित्य बिर्ला नुवोची 51 टक्के भागीदारी आहे. या बँकेला 2015 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पेमेट बँकेचं लायसन्स मिळालं होतं.

First Published: Nov 20, 2019 11:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading