हैदराबाद, 9 नोव्हेंबर : कोरोना व्हायरस लॉकडाउनदरम्यान (Coronavirus Lockdown) 19 वर्षीय ऐश्वर्याने कॉलेजमधील आपला ऑनलाइन क्लास सुरू ठेवण्यासाठी कुटुंबाकडे लॅपटॉपचा आग्रह धरला होता. सेकंड हँण्ड लॅपटॉप तरी घेऊन द्या असं तिचं म्हणणं होतं. मात्र गरीब परिस्थितीमुळे कुटुंबाला तिला लॅपटॉप घेऊन देता आलं नाही. अशातच तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली.
दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजच्या (Delhi College) विद्यार्थिनीने गेल्या आठवड्यात आपल्या गृहनगर तेलंगणामध्ये आत्महत्या केली. ऐश्वर्याने एक सुसाइट नोट लिहिलं आहे. कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये ऐश्वर्यासारख्या अनेक कुटुंबाना आणि विद्यार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला हे समोर येते. ऐश्वर्याचे वडील मोटासायकल मॅकेनिक आहेत. मुलीच्या आत्महत्येचा त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. ते म्हणतात की, त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी कसेबसे पैसे जमा केले होते. ऐश्वर्याने 12 वीमध्ये 98.5 टक्के मिळवले होते. तिच्या कुटुंबाला तिचा अभिमान होता. ऐश्वर्याच्या आईनेही आपल्या भावना व्यक्त केल्या, त्या म्हणाल्या माझ्या हुशार मुलीसारखी परिस्थिती इतर कोणत्याही मुलीवर कधी येऊ नये.
हे ही वाचा-जेलमध्ये असताना केला असा कारनामा की 8 वर्षांनंतर बाहेर येताच मिळाली सरकारी नोकरी
मॅथ्स ऑनर्सच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थिनी ऐश्वर्या फेब्रुवारी महिन्यात कोरोनामुळे शाळा-कॉलेज बंद झाल्यानंतर घरी परतली होती. ऑक्टोबर महिन्यात तिने वडिलांकडे लॅपटॉप घेण्यास सांगितले. मोबाइलमध्ये क्लास अटेंड करणं अवघड जातं. त्यामुळे सेकंड हँण्ड लॅपटॉप घेण्याचा आग्रह धरला. यावर वडिलांनी काही दिवस थांबवण्यास सांगितलं. त्यानंतर कधीच तिने लॅपटॉपचा विषय आई-वडिलांसमोर केला नाही. गेल्या मंगळवारी जेव्हा कुटुंबातील सर्वजण लिव्हिंग रूममध्ये बसले होते, तेव्हा दुसऱ्या खोलीत जाऊन तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने एक सुसाइड नोट लिहिली आहे. त्यात ती म्हणते...माझ्यामुळे कुटुंबाला खूप खर्च करावा लागत आहे. मला त्यांच्यावर ओझं व्हायचं नाहीये...माझ्या शिक्षणामुळे त्यांच्यावर ओझं वाढत आहे. मात्र शिक्षण नाही घेतलं तर मी जिवंत राहू शकत नाही. कृपया माझी सरकारकडे विनंती आहे की, INSPIRE स्कॉलरशिप कमीत कमी एक वर्षांपर्यंत करावी.