बब्बू शेख, प्रतिनिधी
मनमाड, 04 डिसेंबर : एकीकडे मुंबईसह इतर मोठ्या शहरात कांद्याने प्रति किलो शंभरी पार केलेली असताना दुसरीकडे मात्र छोट्या शहरात कांदा 50 ते 60 रुपये किलो दराने मिळत आहे. त्यामुळे मोठ्या शहरात कांदा दरवाडीला दलाल आणि नफेखोरी करणारे जबाबदार असल्याचे समोर येत आहे. छोट्या शहरात कांदा स्वस्त असतांनादेखील मोठ्या शहरात त्याचे भाव गगनाला का भिडले आहे, याचा तपास केला असता लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात कांद्याचे भाव हे तीन प्रतवारीनुसार ठरवले जातात.
व्यापारी चांगला कांदा हा जास्तीत-जास्त दराने खरेदी करतात मध्यम दर्जाची कांदा सरासरी तर हलक्या प्रतवारीचा कांदा हा कमीतकमी कमी भावाने खरेदी केला जातो. चांगला कांदा परदेशात आणि देशातील इतर राज्यात पाठविला जातो. मध्यम दर्जाचा कांदा हा राज्यातील मुंबईसह इतर मोठ्या शहरात तर हलक्या प्रतीचा कांदा छोट्या शहरापासून ग्रामीण भागात विकला जातो. सध्या बाजार समितीत लिलावासाठी आलेल्या कांद्यापैकी 2 ते 5 टक्के कांद्याला जास्तीत जास्त भाव मिळत आहे.
इतर बातम्या - हैदराबाद प्रकरण: आरोपीचा झाला होता प्रेम विवाह, पत्नी 7 महिन्याची गर्भवती
उर्वरित सर्व कांदा हा सरासरी 7 हजार रुपये आणि कमीत कमी 2 हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. सध्या बाजार समित्यात येणारा कांदा हा मध्यम व हलक्या प्रतीचा आहे. त्याला भावदेखील सरासरी 7 हजार ते कमीत कमी 2 हजार रुपये मिळत असून हाच कांदा छोट्या शहरापासून मोठ्या शहरात पाठविला जात आहे.
छोट्या शहरात हा कांदा 50 ते 60 रुपये किलो दराने मिळत असतांना मुंबईत मात्र 100 ते 125 रुपये किलो दराने का विकला जात आहे याचा तपास शासनाने करावा अशी मागणी केली जात आहे.
व्हायरल बातमी - PUBG गेममुळे तरुणाच्या डोक्यावर परिणाम, व्यक्तीचं नाव ऐकून विश्वास बसणार नाही!