नाशिकच्या कांद्याला सोन्याचे दिवस.. चोरट्यांवर 'तिसरा डोळा' ठेवणार नजर!

सध्या कांद्याला सोन्याचे दिवस असल्याचे पाहून चोरट्यांनी कांदा चोरीकडे आपला मोर्चा वळवून मालेगाव आणि कळवण तालुक्यात दोन ठिकाणी लाखो रुपयांच्या कांद्यावर डल्ला मारला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2019 09:04 PM IST

नाशिकच्या कांद्याला सोन्याचे दिवस.. चोरट्यांवर 'तिसरा डोळा' ठेवणार नजर!

बब्बू शेख,(प्रतिनिधी)

मनमाड,26 सप्टेंबर: ज्या वस्तूंची मागणी आणि किमतीत वाढ होते ती वस्तू चोरण्यासाठी चोरांच्या टोळ्या देखील सक्रीय होतात, असे म्हटले जाते. असाच काहीसा प्रकार कांद्याबाबत घडला आहे. सध्या कांद्याला सोन्याचे दिवस असल्याचे पाहून चोरट्यांनी कांदा चोरीकडे आपला मोर्चा वळवून मालेगाव आणि कळवण तालुक्यात दोन ठिकाणी लाखो रुपयांच्या कांद्यावर डल्ला मारला आहे. या घटनेचा मनमाड शहरासह परिसरातील शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांनी धसका घेतला आहे. काही शेतकऱ्यांनी तर कांदा चाळीवर खडा पहारा सुरु केला आहे. पगारी राखणदार ठेवण्यात आले आहे. राखणदार मिळत नसल्याने काही शेतकरी, व्यापाऱ्यांनी कांदा चाळीत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वात जास्त कांदा हा व्यापाऱ्याकडे असतो. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी तर तातडीने कांदा शेडमध्ये सीसीटीव्ही बसवून घेतले आहेत. त्यामुळे आता कांदा चोरताना चोरट्यांना दहा वेळा विचार करावा लागणार आहे. कारण आता इतर महागड्या वस्तूप्रमाणे कांद्यावर देखील तिसऱ्या डोळ्याची नजर आहे. मनमाड शहरात कांदा व्यापाऱ्यांची मोठी संख्या आहे. त्यात काही व्यापारी निर्यातदार असून बाजार समितीत शेतकऱ्याकडून कांदा खरेदी केल्यानंतर तो शेडमध्ये नेला जातो. तेथे प्रतवारीनुसार कांदा वेगळा केल्यानंतर गोण्यात भरून तो वेगवेगळ्या राज्यात आणि विदेशात पाठविला जातो. सध्या कांद्याच्या भावात चांगलीच वाढ झाली. आधी कांदा चाळीत-खळ्यात, मळ्यात उघड्यावर ठेवण्यात येत होता. त्यामुळे तो सहज चोरता येतो, ही संधी साधून मालेगाव तालुक्यातील कौळाणे आणि कळवणच्या मोकभगणी येथे चोरट्यांनी चाळीतील साठवून ठेवलेल्या कांद्यावर डल्ला मारून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा कांदा चोरून नेला. दोन वर्षांपूर्वी देखील कांद्याच्या भावात वाढ झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी कांदा चोरीच्या घटना घडल्या होत्या. आताही चोरटे कांदा चोरी करू लागल्याचे पाहून मनमाड शहर परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यासोबत व्यापाऱ्यामध्ये खळबळ उडून त्यांनी एका प्रकारे कांदा चोरीच्या घटनांचा धसकाच घेतला आहे. काही शेतकरी कांदा चाळीवर खडा पहारा देत आहे. काहींनी राखणदार ठेवले तर काही सीसीटीव्ही लावण्याच्या तयारीत आहे. काही कांदा व्यापाऱ्यांनी तर तातडीने कांदा शेडवर सीसीटीव्ही बसवले देखील आहे. त्यामुळे चोरट्यांना कांदा चोरी करणे आता सोपे राहिले नसून जर त्यांनी तसा पर्यंत केला तर सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्यामुळे तुरुंगाची हवा खाण्याची वेळ त्यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की..

चक्क विहीरच गेली वाहून, बारामतीतला VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2019 09:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...