Elec-widget

कांद्याचा पुन्हा वांदा, भाव कोसळल्यानं उत्पादन खर्चही निघेना

कांद्याचा पुन्हा वांदा, भाव कोसळल्यानं उत्पादन खर्चही निघेना

राज्यात सध्या उन्हाळी कांद्याची आवक वाढू लागल्यानं कांद्यांचा भाव घसरला असून 7 रूपयांवर आला आहे. त्याचा फटका कांदा उत्पादकांना बसला आहे.

  • Share this:

औरंगाबाद,ता.06 मे : राज्यात सध्या उन्हाळी कांद्याची आवक वाढू लागल्यानं कांद्यांचा भाव घसरला असून 7 रूपयांवर आला आहे. त्याचा फटका कांदा उत्पादकांना बसला आहे. राज्यात सध्या उन्हाळी कांद्याची आवक वाढू लागलीय. त्याचा फटका कांदा उत्पादकांना बसलाय.

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांच्या शेतावर कांद्याची खरेदी जेमतेम 6 ते 7 रुपये किलोच्या दरानं होतेय. त्याचवेळी कांद्याचा प्रतिकिलो उत्पादनखर्च हा 12 रुपयांपेक्षा जास्त असल्यानं कांद्याचं पीक आता शेतकऱ्यांसाठी अडचणीचं ठरू लागलं आहे.

कांद्यांचा उत्पादनखर्च एकरी सरासरी 45 ते 50 हजार रुपयांवर गेलाय. तर एक एकरातला कांदा विकून जेमतेम 35 ते 40 हजार रुपये हातात येत असल्यानं कांदा उत्पादकांना हे पीक सध्या परवडेनासं झालंय. उत्तर महाराष्ट्रातही कांदा गडगडल्यानं शेतकरी पुरता हवालदिल झालाय.

सरकारी कांदा खरेदी सुरु झाली असली तरी ती अतिशय कमी असल्यानं सरकारी कांदा खरेदीचं प्रमाण वाढवावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागलीय. यावर राज्यातलं पणन खातं, केद्रींय अन्नमंत्रालय काय हालचाली करतंय त्यावरच भावाचं पुढचं गणित ठरणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2018 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...