कांदा उत्पादक शेतकरी वैतागला, मुख्यमंत्र्यांना मनी ऑर्डर केले शिल्लक राहिलेले 6 रुपये

कांदा उत्पादक शेतकरी वैतागला, मुख्यमंत्र्यांना मनी ऑर्डर केले शिल्लक राहिलेले 6 रुपये

संगमनेर तालूक्यातील अकलापुरच्या शेतकऱ्याला 3 टन कांदा विकून अवघे सहा रुपये शिल्लक राहिले आहेत. या सगळ्यावर वैतागून शेतकऱ्याने शिल्लक राहिलेले 6 रुपये मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर केले आहेत.

  • Share this:

हरीष दिमोटे, प्रतिनिधी

शिर्डी, 08 डिसेंबर : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. संगमनेर तालूक्यातील अकलापुरच्या शेतकऱ्याला 3 टन कांदा विकून अवघे सहा रुपये शिल्लक राहिले आहेत. या सगळ्यावर वैतागून शेतकऱ्याने शिल्लक राहिलेले 6 रुपये मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर केले आहेत.

काबाडकष्ट करून आणि लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने आता करायचं काय असा प्रश्न राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. संगमनेर तालूक्यातील अकलापुर येथील श्रेयश आभाळे या तरुण शेतकऱ्याने आपल्या दोन एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली.

त्यासाठी ठिबकची व्यवस्था करत जवळपास 2 लाख रुपये खर्च केले. आपल्याला फायदा होणार ही अपेक्षा या तरुणाला होती. पण त्याच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं आहे. गुरुवारी श्रेयस आपल्याकडील कांद्याच्या 51 गोण्या घेऊन संगमनेर बाजार समीतीत गेला. तर त्याच्या 2657 किलो कांद्याला अडीच रुपये 75 पैसे आणि 63 पैसे असे 3 वेगवेगळे दर मिळाले.

एकुण पैसे झाले 3208 रुपये. त्यातून हमाली 139 रुपये. तोलाई 101 रुपये. वाराई 51 रुपये आणि गाडी भाडं 2910 रुपये. हे सगळं वजा करून शिल्लक राहीले अवघे सहा रुपये. आता या शेतकऱ्याने त्याचं काय करावं असा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही.

आता हातात पडलेले 6 रुपये घरी नेऊन तरी काय करणार त्यामुळे हताश झालेल्या या तरुणाने आपला राग व्यक्त करत शिल्लक राहिलेले 6 रुपयेदेखील मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डर केले.

एकतर शेतकरी दुष्काळाने हैराण झाला आहे. त्यात महागाईच्या परिस्थितीत कसं बसं शेतात उत्पादन घेऊन आपल्याला दोन पैसे मिळतील अशी त्याची आशा आहे. मात्र सध्या कोसलेले भाव बघता शेतकरी जगणार कसा? असा प्रश्न उपस्थित झालाय. याचा सरकारनेच काय आपणदेखील विचार करण्याची गरज आहे.

जेव्हा दारूच्या नशेत देशाचं रक्षण करणाऱ्या पोलिसांवरच उठतो हात, पाहा हा संतापजनक VIDEO

First published: December 8, 2018, 2:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading