Home /News /news /

Immunity Booster: स्वयंपाकघरातील या दोन गोष्टींचा रस कित्येक आजारांवर आहे फायदेशीर

Immunity Booster: स्वयंपाकघरातील या दोन गोष्टींचा रस कित्येक आजारांवर आहे फायदेशीर

कांदा आणि आल्याच्या रसातही अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. कांद्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन-ई असते, ज्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होतात.

    नवी दिल्ली, 20 जानेवारी : कांदा (Onion) आणि आल्याचा (Ginger) रस आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. यामुळे पचनक्रिया सुधारण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यास मदत होते. कांदा आणि आल्याचा रस गर्भवती महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अॅनिमियाच्या समस्येवरही याचा फायदा होईल. डोळ्यांसाठी कांदा आणि आल्याचा रस डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. कांद्याचा रस तुमच्या शरीरात ग्लुटाथिओन तयार करतो. हा एक प्रकारचा प्रोटीन आहे, जो डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय कांदा आणि आल्याच्या रसातही अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. कांद्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन-ई असते, ज्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होतात. गर्भवती महिलांसाठी कांदा आणि आल्याच्या रसाचे सेवन गर्भवती महिलांसाठी देखील फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी कांद्यामध्ये आढळते, ज्यामुळे गर्भवती महिलांमध्ये प्रतिकारशक्ती वाढते. दुसरीकडे, आल्याचा रस संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल. कांद्यामध्ये सल्फर, लोह आणि जस्त असते. याशिवाय यामध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते. हे वाचा - या 3 समस्यांमुळे येतो हाडातून कट-कट असा आवाज, वेळीच व्हा सावध! अशाप्रकारे घरीच घ्या काळजी रक्त कमी होणे कांदा आणि आल्याचा रस शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतो. आल्याच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. दुसरीकडे, कच्च्या कांद्याचा रस अॅनिमियाच्या (Anemia) समस्येवर फायदेशीर ठरेल. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास आले आणि कांद्याचा रस पिऊ शकतो. हे वाचा - Hero इलेक्ट्रिक आणि महिंद्राचा मोठा करार; वर्षाला 10 लाख दुचाकी इलेक्ट्रिक गाड्यांची होणार निर्मिती पुरुषांसाठी फायदेशीर कांदा आणि आल्याचा रस देखील लैंगिक शक्ती (Sexual power) वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. कांद्याच्या रसाचे सेवन केल्याने पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढते. यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते. या दोन्ही गोष्टींमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे अँटिऑक्सिडंट पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवू शकतात. कांदा आणि आल्याचा रस समान प्रमाणात मिसळा. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचे प्या. यामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतील. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या