S M L

डहाणूच्या समुद्रात ओएनजीसीचं हेलिकॉप्टर कोसळलं ; 4 जणांचे मृतदेह सापडले

Chandrakant Funde | Updated On: Jan 13, 2018 06:18 PM IST

डहाणूच्या समुद्रात ओएनजीसीचं हेलिकॉप्टर कोसळलं ; 4 जणांचे मृतदेह सापडले

13 जानेवारी, मुंबई : ओएनजीसीचं हेलिकॉप्टर मुंबईच्या समुद्रातच कोसळल्याचं स्पष्ट झालंंय. या हेलिकाॅप्टरमध्ये 5 अधिकारी आणि दोन पायलट होते. आतापर्यंत चारजणांचा मृतदेह सापडले आहे.

 

पवन हंस कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं. त्याने जुहू विमानतळावरून ओएनजीसीच्या पाच उपमहाव्यवस्थापकांना घेऊन उड्डाण केलं होतं. उड्डाण केल्यानंतर  सकाळी साडे दहापासून संपर्क तुटला होता. शेवटचा संपर्क सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी झाला.  हेलिकॉप्टर डहाणू किनारपट्टीपासून 40 किलोमीटर आत समुद्रात कोसळलंय. समुद्रात हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहे. आतापर्यंत चार जणांचे मृतदेह हाती लागले आहे. उर्वरीत 3 जणांचा शोध घेतला जात आहे.


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2018 02:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close