उद्यापासून सुरू होतोय OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro चा ऑनलाइन सेल; इथे मिळेल ऑफर

उद्यापासून सुरू होतोय OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro चा ऑनलाइन सेल; इथे मिळेल ऑफर

हा सेल फक्त प्राइम मेंबर्ससाठीच असणार आहे. अन्य ग्राहकांना हे फोन 17 मे नंतर खरेदी करता येतील.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे : गेले अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर आणि टेक जगात चर्चा असलेले OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro हे दोन्ही स्मार्टफोन 14 मे रोजी भारतासह अमेरिका आणि युरोपमध्ये लाँच झाले. या दोन्ही स्मार्टफोनची Amazon वर 16 मे रोजी दुपारी 12 वाजतापासून ऑनलाईन विक्री सुरू होणार आहे. हा सेल फक्त प्राइम मेंबर्ससाठीच असणार आहे. अन्य ग्राहकांना हे फोन 17 मे नंतर खरेदी करता येतील. या दोन्ही स्मार्टफोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. तर जाणून घ्या हे फोन्स खरेदी करताना तुम्हाला कोणकोणत्या ऑफर्सचा लाभ घेता येईल.

Jio च्या 299 रुपयांच्या रिचार्जवर 9300 रुपयांचा लाभ - 'जियो-वनप्लस 7 सीरीज Beyond Speed Offer’च्या माध्यमातून वनप्लस 7 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जिओच्यावतीने मोठा डिस्काउंट दिला जात आहे. जियोचं 299 रुपयांचं रिचार्ज करणऱ्या ग्राहकांना 5,400 रुपये कॅशबॅक मिळतील. याशिवाय 3,900 रुपयांचं अतिरिक्त लाभसुद्धा तुम्हाला मिळेल. म्हणजे 9,300 रुपयांचा हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांला मिळेल.

OnePlus7 भारतात झाला लाँच; इथे पाहा First look आणि फीचर्स

5400 रुपयांची कॅशबॅक ऑफर - 5400 रुपयांची ही कॅशबॅक ऑफर ग्राहकांना 150 रुपयांच्या 36 व्हाउचर्सच्या माध्यमातून मिळेल. हे सगळे सगळे व्हाउचर्स तुम्हाला जिओच्या अॅपवर मिळतील. त्यांचा उपयोग तुम्ही पुढल्या 299 रुपयांच्या रिचार्जपर्यंत करू शकाल. या ऑफरमध्ये ग्राहकांना 3G आणि 4G डेटा रोज मिळेल, हा रिचार्ज 28 दिवसांपर्यंत व्हॅलिड राहणार आहे. यात तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स, एसएमअस याशिवाय जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा यासारखे अॅप्स वापरता येतील. 5,400 रुपयांच्या कॅशबॅक ऑफरचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना 3,900 रुपयांचा अतिरिक्त लाभ घेता येईल.

- Zoomcar: 2,000 रुपयांपर्यंत किंवा 20% यापैकी जे कमी असेल ते.

- EaseMyTrip: फ्लाइट तीकिट बुकिंगवर 1550 रुपयांची सूट आणि बस तीकिट बुकिंगवर 15 टक्के सूट दिली जाणार आहे.

- Chumbak: किमान 1,699 रुपयांच्या खरेदीवर 350 रुपयांची सूट मिळेल.

तुमच्या टीव्हीच्या सेट टाॅप बाॅक्समध्ये होणार 'हा' मोठा बदल

'जियो बियॉन्ड स्पीड ऑफर' - ही ऑफर जुन्या आणि नव्या दोन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी असणार आहे. जे ग्राहक OnePlus 7 किंवा OnePlus 7 Pro खरेदी करतील त्यांनाच हा लाभ मिळेल. तसंच जिओचं 299 रुपयांचं रिचार्च करणाऱ्यांनाच याचा लाभ मिळेल.

SBI कार्डवरसुद्धा ऑफर - वनप्लसचे हे फोन खरेदी करताना जर तुम्ही SBI द्वारे कार्ड करत असला तर तुम्हाला 2,000 रुपयांचं इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय Amazonवर 6 महीन्यांपर्यंत No-cost EMI या सुविधेचा लाभ सुद्धा तुम्हाला घेता येईल.

First published: May 15, 2019, 4:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading