भारतात 14 मे ला लाँच होणार 'हे' दोन स्मार्टफोन; अशी आहेत फिचर्स

भारतात बेंगळुरू येथील एका एक्झिबिशन सेंटरमध्ये होणार इव्हेंट.

  • Share this:

OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro हे दोन्ही स्मार्टफोन भारत, अमेरिका आणि युरोपमध्ये एकाच दिवशी म्हणजे 14 मे रोजी रात्री 8.15 वाजता लाँच होणार असल्याचं कंपनीने एका ट्विटद्वारे जाहीर केलं आहे. भारतात बेंगळुरू येथील एका एक्झिबिशन सेंटरमध्ये हा इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे.

कंपनीने मोबाईल लाँचिंग संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये एक शॉर्ट लिंक देण्यात आली असून, त्यात इव्हेंटबाबत पूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसंच बेगळुरू येथे होणाऱ्या इव्हेंटमध्ये जर कुणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी 25 एप्रिलपासून तिकीट विक्री सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच कंपनीच्या अधिकृत YouTube Chanel वरसुद्धा हा प्रोग्राम तुम्ही पाहू शकाल असं सांगण्यात आलं आहे.

अशी राहू शकते किंमत - कंपनीने या स्मार्टफोन्सच्या किमतींबाबत अद्याप कोणताच खुलासा केलेला नाही. मात्र, OnePlus 7 आणि 7 Pro हे दोन्ही फोन त्याच्या अधी लाँच झालेल्या OnePlus 6T पेक्षा महाग राहतील असं वनप्लस चे सीईओ Pete Lau यांनी म्हटलं आहे. त्यावरून या फोनची किंमत साधारण 50 हजाराच्या जवळपास राहू शकते.

Loading...

OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro हे दोन्ही स्मार्टफोन 2 स्टोअरेज व्हेरियंटमध्ये असणार आहेत. पहिला 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजचा, तर दूसरा 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेजचा असणार आहे. हे फोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध राहणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

याशिवया 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोअरेज असणारं OnePlus 7 Pro चं तिसरं व्हेरियंटसुद्धा या कार्यक्रमात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. OnePlus 7 आणि 7 Pro या दोन्ही फोनमध्ये लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर असणार आहे.

डिस्प्लेच्या बाबतीत बोलायचं झालं तर OnePlus 7 ला 6.4 इंचाचा FHD डिस्प्ले आणि OnePlus 7 Pro ला 6.7 इंचाचा QHD डिस्प्ले असणार आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमरा सेटअपसह मिळेल. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि दूसरा कैमरा 8 मेगापिक्सल राहील. तर तिसरा कॅमेरा 16 मेगापिक्सलचा राहील. तर 4,000 mAh ची बॅटरी राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: onePlus-7
First Published: Apr 24, 2019 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...