वनप्लसच्या लेटेस्ट 5G स्मार्टफोनवर मिळवा 4 हजारांचा डिस्काउंट

वनप्लसच्या लेटेस्ट 5G स्मार्टफोनवर मिळवा 4 हजारांचा डिस्काउंट

ग्राहकांनी SBI क्रेडिट कार्ड आणि EMI या पर्यायाचा वापर केला,तर त्या ग्राहकांना या फोनवर चार हजार रुपयांचा डिस्काउंट (Discount) मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई 15 मे: तुम्हाला नवा5G फोन खरेदी करायचा आहे कामग तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.कारण अॅमेझॉनवरून वनप्लस प्रो 5G (OnePlus 9 Pro 5G)हा लोकप्रिय आणिलेटेस्ट स्मार्टफोन (Smartphone)सवलतीत घरी मागवता येणार आहे. या फोनची किंमत 64,999 रुपये आहेमात्र ग्राहकांनी SBI क्रेडिट कार्ड आणि EMI या पर्यायाचा वापर केला,तर त्या ग्राहकांना या फोनवर चार हजार रुपयांचा डिस्काउंट (Discount) मिळणार आहे.

OnePlus 9 Proच्या 8GB RAM 128GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 64,999 रुपये आहे. तसंच 12GB RAM 256GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 69,999रुपये आहे. हा फाइव्ह जी फोन (5G Smartphone) आहे. या फोनची स्पेसिफिकेशन्स पाहू या.

OnePlus 9 Pro या फोनचा डिस्प्ले 6.7 इंचांचा असून,तो QHD AMOLED प्रकारचा आहे. डिस्प्लेचं रिझॉल्युशन 1440x3216 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड11ऑपरेटिंग सिस्टीमवर (Android OS)आधारित असलेल्या Oxygen OS 11या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. या फोनमध्ये ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आहे.

हा फोन कार्बन ब्लॅक आणि लेक ब्लू अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या डिस्प्लेला LTPO टेक्नॉलॉजीची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्ट 120Hz फीचर एनेबल होतं.

OnePlus 9 Proच्या मागच्यापॅनेलमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप (Quad Camera Setup)देण्यात आलेला आहे.म्हणजेच फोनमध्ये पाठीमागच्या बाजूला चार कॅमेरे आहेत. त्यात48मेगापिक्सेलचाSony IMX789प्रायमरी कॅमेरा सेन्सर असून,त्याचं अॅपर्चरएफ/1.8एवढं आहे.50मेगापिक्सेलचाSony IMX766सेकंडरी कॅमेरा सेन्सरत्यात असून,त्याला अल्ट्रा-वाइड फ्रीफॉर्म लेन्स आहे. त्याशिवाय8मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा आणि2मेगापिक्सेल मोनोक्रोम कॅमेरा सेन्सरहीआहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये कंपनीने16मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर (Front Camera Sensor)देण्यात आला आहे.या फोनची बॅटरी4500 mAh क्षमतेची असून,ती 65T Warp चार्ज आणि वार्प चार्ज 50W फास्ट चार्जिंग (Fast Charging) तंत्रज्ञानाद्वारे चार्ज होते.कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये वाय-फाय 6, 5G, 4जी एलटीई,ब्लू-टूथ व्हर्जन5.2,जीपीएस,ए-जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट अशा सुविधा देण्यात आल्याआहेत.

First published: May 15, 2021, 7:17 PM IST

ताज्या बातम्या