एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीला वर्ष झालं पण...!

एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीला वर्ष झालं पण...!

मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पुलावर काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेला काल एक वर्ष पूर्ण झाली.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी

मुंबई, 29 सप्टेंबर: मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पुलावर काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेला काल एक वर्ष पूर्ण झाली. रेल्वे स्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 प्रवाशांना नाहक आपला जीव गमवावा लागला होता. सकाळी साडे 9 च्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे कामाला निघालेल्या मुंबईकरांवर संकट कोसळलं होतं. आजही या घटनेची आठवण येताच अंगावर काटे येतात.

पूल पडला अशा एका अफवेमुळे तब्बल 22 मुंबईकरांचा जीव गेला. दरम्यान काल संध्याकाळी मृतांच्या नातेवाईकांनी एल्फिन्स्टन पुलावर मेणबत्त्या पेटवून मृतांना श्रद्धांजली वाहिली.

तारीख - 29 सप्टेंबर 2017

ठिकाण - एल्फिन्स्टन रेल्वे स्थानक पूल

वेळ - सकाळी 10 वा.

हा दिवस, ठिकाण आणि वेळ कोणताच मुंबईकर विसरणार नाही.

मुंबईच्या परळ परिसरात राहणाऱ्या रमेश शेंदाणे आजही ती दुर्घटना विसरले नाहीत. 29 सप्टेंबरच्या सकाळी एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा दुर्देवी अंत झाला.

नेहमी प्रमाणे या पुलावर रेल्वे प्रवाशांची गर्दी होती. अचानक आलेल्या पावसामुळं पुलावर प्रवाशांची गर्दी वाढत गेली. त्याच दरम्य़ान पुलावर गर्दीत उभ्या असलेल्या एका फुल विक्रेत्याच्या डोक्यावरील फुलांची पाटी खाली पडली आणि पुलावर उभ्या असलेल्या रेल्वे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या टागोरनगरमध्ये राहणाऱ्या रोहित परबचा मृत्यू झाला होता. त्याचं कुटुंब अद्यापही त्या धक्क्यातून सावरलं नाही. या दुर्घटनेनंतर रोहितच्या कुटूंबातील एका सदस्याला प्रशासनानं नोकरीचं आश्वासन दिलं होतं. मात्र ते अजुनही पुर्ण झालं नाही.

या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. परळ आणि एल्फिन्स्टला जोडणारे दोन पुल उभारण्यात आले. त्यासाठी लष्कराची मदत घेण्यात आली. मात्र पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकांवर आजही परिस्थिती जैसे-थेचं आहे.

मुंबईतील लोकल प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत स्थानकावरील पुल अपुरे आहेत. रेल्वे प्रशासनानं या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. मात्र गेल्या वर्षीच्या त्या दुर्घटनेनंतरही मध्य रेल्वेनं कोणताच धडा घेतला नसल्याचं चित्र आहे.

VIDEO : भररस्त्यावर सपासप वार करून केला खून,पोलिसांची बघ्याची भूमिका

First published: September 29, 2018, 10:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading