Home /News /news /

अशीही एक शिक्षिका, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुलांच्या घरी जाऊन पोहोचवलं मिड-डे मील

अशीही एक शिक्षिका, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुलांच्या घरी जाऊन पोहोचवलं मिड-डे मील

ही शिक्षिका स्वत: विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना धान्य पुरवित आहे. त्यांच्या कामाचं कौतुक आहे.

    तिरुवअनंतपुरम, 16 मार्च : सध्या जगभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला असून अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर एक सकारात्मक बातमी आली आहे. घरातील परिस्थिती बिकट असली तरी मुलांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी शाळांमध्ये मुलांसाठी मध्यांन्ह भोजन आहार (Mid day meal) देण्यात येतो. मात्र सध्या खरबदारी म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत मुलांना पोष्टिक आहार मिळावा यासाठी एक शिक्षिका विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना धान्य पुरवित आहे. बेबी गिरीजा असं या अंगणवाडी शिक्षिकेचं नाव आहे.  तिरुवअनंतपुरम येथील विद्यार्थ्यांना अंगणवाडीत येणं शक्य नसल्याने शिक्षिका स्वत: मुलांच्या घरोघरी जाऊन त्यांना धान्याचे वापर करीत आहे. राज्य सरकारने याबाबत आदेश दिल्याचे त्या सांगतात. कोरोना सारख्या गंभीर आजारात मुलांना पौष्टिक अन्न मिळावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. भारतात 110 लोकांना कोरोनाची लागण भारतात विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 110 झाली आहे, तर उत्तराखंडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. तर, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात रुग्णांची संख्या वाढती आहे. भारतात अद्याप कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. भारतात महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आहेत. यातील पुण्यात 16 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india, Mid day meal

    पुढील बातम्या