Home /News /news /

काकूवर होतं एकतर्फी प्रेम, पुतण्याने काकावर कुऱ्हाडीने केले सपासप वार

काकूवर होतं एकतर्फी प्रेम, पुतण्याने काकावर कुऱ्हाडीने केले सपासप वार

जमिनीच्या वादातून मुकेशने आपल्या काकाची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

    बब्बू शेख, प्रतिनिधी येवला, 19 मार्च : काकू-पुतण्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना येवल्यात घडली आहे.  सख्ख्या पुतण्याने आपल्या काकाचा निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना येवल्याच्या खामगाव येथे घडली. काकूवर एकतर्फी प्रेमात अडथळा येत असल्यामुळे पुतण्याने हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. येवला तालुक्यातील खामगाव इथं ही धक्कादायक घटना घडली आहे.  मुकेश शेळके असं या अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आज सकाळी मुकेश यांने आपल्या काकाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. जमिनीच्या वादातून मुकेशने आपल्या काकाची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. परंतु, पोलीस चौकशीत मुकेशने दिलेल्या माहितीमुळे पोलीसही चक्रावून गेले.  मुकेश यांचं आपल्याच काकूवर एकतर्फी प्रेम होतं. काकूवर एकतर्फी प्रेम करत असताना काका त्यात अडथळा ठरत होता. त्यामुळे मुकेशने आपल्याच काकाचा काटा काढण्याचं ठरवलं. आज सकाळी मुकेशने  आपल्या काकाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी मुकेशला अटक केली असून या प्रकरणी त्याच्या विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास येवला पोलीस करत आहे. (सविस्तर बातमी लवकरच)
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या