जालन्यातून दिलासादायक बातमी, 2 कोरोना संशयितांपैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह

जालन्यातून दिलासादायक बातमी, 2 कोरोना संशयितांपैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह

कोरोना व्हायरस संदर्भात जालन्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

  • Share this:

विजय कमळे-पाटील, प्रतिनिधी

जालना, 18 मार्च : कोरोना व्हायरस संदर्भात जालन्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जालन्यात आढळलेल्या दोन कोरोना संशयित रुग्णांपैकी एका रुग्णाचा वैद्यकीय रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. संशयितांपैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, चीनहून परतलेल्या त्या संशयिताचा रिपोर्ट अद्याप आला नसल्यामुळे धकधक मात्र कायम आहे.

संशयित रुग्ण हा जालना जिल्ह्यातील रहिवासी असून काही दिवसांपूर्वी आपल्या मित्रांसोबत गोव्याला फिरायला गेला होता. तिकडे त्याचा संपर्क काही विदेशी पर्यटकांशी आला होता. दरम्यान, सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्याने आपल्याला कोरोनाचा संसर्ग तर झाला नाहीना या धास्तीने तो जिल्हा सामान्य रुग्णालयात आला होता. दरम्यान, त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आता सुटकेचा निश्वास सोडला.

परंतु, काही दिवसांपूर्वी चीनहुन परतलेल्या एका संशयिताचा स्राव देखील टेस्टटिंगसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेला असून त्याचा वैद्यकीय अहवाल मात्र, अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे धाकधूक कायम आहे. त्या संशयित रुग्णाला सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले असून त्याच्या संपर्कात आलेल्या 34 जणांना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाइन करण्यात आलेलं आहे.

राज्यात रुग्णांची संख्या 44 वर

दरम्यान, राज्यात कोरोना (Coronavirus) बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत एका 68 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पुण्यातूनही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधित (Covid - 19) रुग्णांची संख्या 44 वर गेली आहे.

आज पुण्यातून (Pune) एका कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबईतून (Mumbai) 68 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यात काही वेळापूर्वी पुण्यातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह महिलेनं कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास (International Travel) केलेला नव्हता. मंगळवारी ज्या संशयित रुग्णाचा कोरोना व्हायरस चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्याच्या संपर्कात आल्यामुळे या महिलेला Covid-19 ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

First published: March 18, 2020, 8:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या