S M L

...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान

मध्यप्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणूकींसोबतच लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घ्या असं आवाहन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलंय.

Updated On: Aug 14, 2018 07:24 PM IST

...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान

नवी दिल्ली,ता.14 ऑगस्ट : मध्यप्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणूकींसोबतच लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घ्या असं आवाहन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलंय. एक देश एक निवडणूक घेण्याची तुमची एवढीच इच्छा असेल तर लोकसभा मुदतीपूर्वीच भंग करून निवडणुका घेण्याची हिंमत पंतप्रधान दाखवतील का असा सवाल काँग्रेसचे नेते अशोक गहेलोत त्यांनी केलाय. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाला पत्र लिहून लोकसभेसोबतच 11 राज्यांच्या विधानसभा निवडणूका घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर देशभर त्यावर चर्चाही सुरू झाली होती.

अमित शहांचं हे पत्र म्हणजे केवळ नाटक आहे अशी टीका अशोक गहेलोत यांनी केली. निवडणुकीच्या पराभवाच्या भितीने भाजप असा डाव खेळण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून राज्यघटनेत बदल करून निवडणुका घेण्याची त्यांची इच्छा आहे. काँग्रेस यासाठी तयार असून फक्त आगामी तिन राज्यांच्या निवडणुकींसोबत त्यांनी सार्वत्रिक निवडणुका घेतल्या पाहिजे असंही काँग्रेसने म्हटलं आहे.

भारतासारख्या मोठ्या देशात वारंवार निवडणुका होत असल्याने सतत आचारसंहिता लागू असते आणि त्या काळात विकासकामे होत नाहीत. खर्च वाढतो आणि प्रशासनावर ताणही वाढतो यामुळे निवडणुका लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्रच घेतल्या पाहिजेत असा भाजपचा युक्तिवाद आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2018 07:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close