Elec-widget

मंत्रालयासमोर आणखी एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर आणखी एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयाच्या समोर आज आणखी एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. सखूबाई विठ्ठल झालटे (वय 65 वर्षे) असं या महिलेचं नावं आहे. यावेळी या महिलेसोबत त्या महिलेचा मुलगाही होता.

  • Share this:

16 फेब्रुवारी, मुंबई : मंत्रालयाच्या समोर आज आणखी एका महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. यावेळी या महिलेसोबत त्या महिलेचा मुलगाही होता. सखूबाई विठ्ठल झालटे (वय 65 वर्षे) असं या महिलेचं नावं आहे. ही महिला नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातील वडगांव बंगु गावची रहिवासी आहे. या महिलेच्या शेतात अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करावी, यासाठी ती सातत्याने शासन दरबारी तक्रार करतेय. पण स्थानिक पातळीवर कोणीच दखल घेत नाही. म्हणून ही महिला आपली कैफियत मांडण्यासाठी आज मंत्रालयात आली होती. पण इथंही तिच्या पदरी निराशाच पडल्याने खोकल्याच्या औषधाचा ओव्हरडोस प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तिला सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेलं. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, मंत्रालयातील वाढत्या आत्महत्यांची सरकारनं आता चांगलीच धास्ती घेतलीय. सर्व सामन्यांच्या तक्रार निवारणासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलंलं आहे. वाढत्या आत्महत्यांमुळे हैराण झालेल्या राज्य सरकारने आता सामान्यांना भेटा, त्यांना सहकार्य करा असे निर्देश अधिकारी वर्गाला दिले आहेत. झिरो पेंडन्सी अँड डेली डीस्पोजल कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. रोज २.३० ते ३.३० ची वेळ सामान्यांना भेटण्यासाठी राखीव ठेवावी, असा शासन आदेश गुरूवारी जारी करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2018 06:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...