S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

गौरी लंकेश हत्येप्रकरणी बेळगावातून आणखी एकाला अटक

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी कर्नाटक एसआयटीकडून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

Updated On: Aug 30, 2018 10:16 AM IST

गौरी लंकेश हत्येप्रकरणी बेळगावातून आणखी एकाला अटक

बेळगाव, 29 ऑगस्ट : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी कर्नाटक एसआयटीकडून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. सागर लाखे असं या आरोपीचं नाव आहे. बेळगाव जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली आहे. कर्नाटक एसआयटीनं या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. सध्या लाखेला अज्ञात स्थळी नेऊन त्याची चौकशी सुरू आहे. सागर लाखे हा बेळगावच्या गणेशपूर भागात राहतो.

गौरी लंकेश हत्या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक झाली आहे. या आरोपींच्या चौकशीत वारंवार सागर लाखेचं नाव समोर येत होतं. त्यामुळे सागरचा शोध घेत मध्यरात्री एसआयटीनं त्याला ताब्यात घेतलं, आणि सकाळी त्याला अटक करण्यात आली.

तर अमोल काळे हाच पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा सिनियर प्लॅनर होता अशी माहिती कर्नाटक एसआयटीच्या सूत्रांनी 28 ऑगस्टला दिली होती. गौरी लंकेश आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात एकाच दुचाकीचा वापर केला असल्याच्या माहितीवरून कर्नाटक एसआयटी मंगळवारी महाराष्ट्रात गाडीच्या तपासणीसाठी दाखल झाली होती.दरम्यान या तिन्ही हत्या एकाच पिस्तूलाने केल्या गेल्याची माहितीही अमोल काळेने कर्नाटक एसआयटीला दिली आहे. अमोल काळेने या पिस्तूलला 'सुदर्शन चक्र' असं नाव दिलं होतं. श्रीकृष्णाचे शस्त्र म्हणून सुदर्शन चक्र असं नाव दिले असल्याची माहिती अमोल काळेने दिली आहे. त्यामुळे आता या सगळ्या दिग्गजांच्या हत्येच गूढ उकलणार यात काही शंकाच नाही. यासाठी महाराष्ट्र एटीएस, सीबीआय आणि कर्नाटक एसआयटी यांनी तपासाला वेग आणला आहे.

गौरी लंकेश आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठीही एकच पिस्तूल वापरल्याचा सीबीआयने पुणे कोर्टात दावा केला होता. त्यामुळे चारही हत्या 7. 65 एम.एम साईझच्या एकाच पिस्तूलने झाला का याचा आता तपास सुरू आहे. आणि याच तपासासाठी सीबीआय एसआटीकडून शरद कळसकरचा ताबा मागितला होता, पण कोर्टाने सीबीआयच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत शरद कळसकरचा ताबा देणारा अर्ज फेटाळला आहे.

 

पाकिस्तानने आशियाई खेळात किती पदकं मिळवली माहीत आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2018 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close