हार्दिक पटेलचा आणखी एक कथित सेक्स व्हिडिओ 'व्हायरल'!

हार्दिक पटेलचा आणखी एक कथित सेक्स व्हिडिओ 'व्हायरल'!

गुजरातची निवडणूक जशी-जशी जवळ येते आहे तसं-तसं गुजरातचं राजकारण चांगलचं तापतयं. पाटीदार आंदोलनाचा पोस्टरबॉय आणि कट्टर भाजपविरोधक युवा नेता हार्दिक पटेल याचा आज आणखी एक व्हिडिओ व्हायरल केला गेलाय. या व्हिडिओमध्ये हार्दिक पटेल आणि त्याचे दोन मित्र एका युवतीसोबत बेडवरबसून बोलताना दिसताहेत. या आधीही म्हणजे कालच हार्दिक पटेलचा एका महिलेसोबतचा कथित व्हिडीओ समोर आला होता.

  • Share this:

14 नोव्हेंबर, गांधीनगर : गुजरातची निवडणूक जशी-जशी जवळ येते आहे तसं-तसं गुजरातचं राजकारण चांगलचं तापतयं. पाटीदार आंदोलनाचा पोस्टरबॉय आणि कट्टर भाजपविरोधक युवा नेता हार्दिक पटेल याचा आज आणखी एक व्हिडिओ व्हायरल केला गेलाय. या व्हिडिओमध्ये हार्दिक पटेल आणि त्याचे दोन मित्र एका युवतीसोबत बेडवरबसून बोलताना दिसताहेत. या आधीही म्हणजे कालच हार्दिक पटेलचा एका महिलेसोबतचा कथित व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओ स्कॅँडल संदर्भात हार्दिक पटेलनं देखील कालच आपलं मौन सोडलं होतं, तरीही आज पुन्हा नव्याने आणखी एक व्हिडिओ व्हायरल केला गेलाय. यावरून व्हायब्रंट गुजरातचं राजकारण शब्दशः व्हायरल लेव्हलला म्हणजेच रसातळाला पोचलंय. असंच इथं खेदाने नमूद करावं लागेल.

हे कथित सेक्स व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी हार्दिक पटेलने अपेक्षेप्रमाणेच भाजपला जबाबदार धरलंय. ऐन गुजरात निवडणुकीच्या तोंडावर मला जाणिवपूर्वकपणे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं हार्दिक पटेलनं म्हटलंय. अशा बदनामी मला काहीच फरक पडत नाही पण किमान गुजराती महिलांचा तरी अपमान करू नका असंही हार्दिक पटेलनं म्हटलंय. हार्दिकने हा मुद्दा थेट गुजराती महिलांच्या अपमानाशी जोडल्याने, या सेक्स व्हिडिओ प्रकरणातून हार्दिकची बदनामी होण्याऐवजी उलट त्याला सहानूभूतीच मिळताना दिसतेय. संघाचे गुजरातमधील तत्कालीन ज्येष्ठ प्रचारक संजय जोशी यांनाही अशाच पद्घतीने सेक्स सीडीज् काढून या लोकांनी बदनाम केलं होतं. याची आठवणही हार्दिक पटेल समर्थकांनी यानिमित्ताने करून दिलीय. त्यामुळे हे कथित सेक्स सीडींचं प्रकरण ऐन गुजरात निवडणुकीत भाजपच्याच अंगाशी येण्याची चिन्हं दिसताहेत. विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वीच हार्दिक पटेलनं आपल्याविरोधात अशा पद्धतीचे कथित व्हिडिओ व्हायरल केले जाऊ शकतात, असं भाकित केलं होतं झालंही तसंच !

 

या सेक्स सीडी प्रकरणात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीही हार्दिकच्या बचावासाठी धावून आलेत. या प्रकरणात भाजप अतिशय गलिच्छ राजकारण करत असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. हार्दिक पटेल हा पाटीदार समाजाचा आवाज बनत असल्यानेच त्याला बदनाम केलं जातंय. त्यामुळे पाटीदार समाजाने या कठिण प्रसंगी त्याच्या पाठिशी उभं राहावं, असं आवाहनही राहुल गांधींनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2017 05:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading