रस्ता नाही यमदेव! खड्डा चुकवताच ट्रकने चिरडलं, भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू

डॉक्टर स्नेहाच्या खड्डे अपघाती मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी रामप्रसाद यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गुरुवारीदेखील भिवंडी वाडा रोडवर अपघात झाला होता.

News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2019 08:17 AM IST

रस्ता नाही यमदेव! खड्डा चुकवताच ट्रकने चिरडलं, भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू

भिवंडी, 12 ऑक्टोबर : भिवंडीमधील रस्त्यांमुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. वाडा भिवंडी रोडवर पुन्हा भीषण अपघात झाला आहे. खड्डा चुकवायला गेलेल्या ट्रकने 60 वर्षीय पादचाऱ्याला उडवलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. कुडूस इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. अपघातात रामप्रसाद गोस्वामी (वय 60) यांचा मृत्यू झाला असून तो मुसारणे इथल्या एका कंपनीत वॉचमेन म्हणून कार्यरत होता तो मूळचा बिहार इथल्या असून वाडा तालुक्यतील कुडूस इथे राहत होता.

डॉक्टर स्नेहाच्या खड्डे अपघाती मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी रामप्रसाद यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गुरुवारीदेखील भिवंडी वाडा रोडवर अपघात झाला होता. भिवंडी-वाडा मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. या मार्गावरील खड्ड्यांने काल, गुरूवारी एका डॉक्टर तरूणीचा बळी घेतल्याची घटना ताजी असताना पुन्हा अपघात झाला आहे. टेम्पो खड्ड्यात आदळून एका वाटसरूच्या हात-पायावरून गेला. या अपघातात 60 वर्षीय व्यक्तीने आपला एक हात आणि पाय गमवला आहे. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कुडूसजवळ शुक्रवारी हा अपघात झाला. टेम्पो मोठ्या खड्ड्यात आदळल्याने चालकाचा ताबा सुटून रामप्रसाद या वाटसरुच्या हात आणि पायावरून टेम्पोचे चाक गेल्याने त्याचा एक हात आणि पाय निकामी झाला आहे.

लग्नाच्या खरेदीसाठी जात होती तरुणी.. त्याआधीच उद्ध्वस्त झाले स्वप्न

लग्नाची स्वप्न रंगवणाऱ्या आणि लोकांना जीवदान देणाऱ्या डॉक्टर तरुणीवर काळाने घाला घातला. रस्त्यावरील खड्ड्यांनी डॉक्टर असणाऱ्या अवघ्या 23 वर्षीय तरुणीची आयुष्याची स्वप्ने उद्ध्वस्त केली.

इतर बातम्या - हायफाय डाएटने नाही, तर या 5 गोष्टी केल्यात तर कधीच नाही वाढणार वजन

Loading...

भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे तरुणीचा बळी गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. भिवंडी-वाडा रोडवर दुर्गाड फाट्याजवळ दुचाकी खड्ड्यात आदळून डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाली. नेहा आलमगिर शेख ( 23) असे या तरुणीचे नाव होते. नेहाचे पुढच्या महिन्यात लग्न होते. ती लग्नाची खरेदी करण्यासाठी जात होती. नव्या जीवनाची सुरुवात नव्या आशा आणि सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या नेहाबाबत मात्र काळाने घात केला. बोहल्यावर चढण्याआधीच नेहाला खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात जीव गमवावा लागला.

इतर बातम्या - Facebook वर मैत्री, दुर्गा पूजेत भेट आणि चार तासांत लग्न!

लग्नाची खरेदी झाल्यानंतर नेहा ठाण्याहून भिवंडीला निघाली होती. दरम्यान त्याच वेळी दुचाकी अचानक खड्ड्यात आदळल्याने नेहाचा तोल गेला. तिला सावरण्याचा एक क्षणही मिळाला नाही. ती खाली पडली. याच वेळी मागून येत असलेल्या भरधाव ट्रकचे चाक नेहाच्या अंगावरून गेले. नेहाचा जागेवरच मृत्यू झाला.

इतर बातम्या - कोल्हपुरात पुन्हा 'आमचं ठरलंय', भाजपला दगा देऊन सेना खासदार करेल का परतफेड?

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2019 08:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...