इक्बाल मिर्ची प्रकरणी महिला रिंकू देशपांडेला ईडीने केली अटक!

इक्बाल मिर्ची प्रकरणी महिला रिंकू देशपांडेला ईडीने केली अटक!

या प्रकरणात आधीच अटक झालेल्या आरोपी रणजित बिंद्राने दिलेल्या माहितीच्या आधारे ईडीने रिकू देशपांडे नावाच्या महिलेला अटक केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने कुख्यात गँगस्टर इक्बाल मिर्ची याचा जवळचा सहकारी हुमायूं मर्चंटला अटक करण्यात आल्यानंतर आता आणखी एका महिला हस्तकाला अटक करण्यात आली आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने हुमायूं मर्चंटला 24 ऑक्टोबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणात आधीच अटक झालेल्या आरोपी रणजित बिंद्राने दिलेल्या माहितीच्या आधारे ईडीने रिकू देशपांडे नावाच्या महिलेला अटक केली आहे. ईडीचा आरोप आहे की रिंकू देशपांडे आणि तिच्या कुटुंबाचे इक्बाल मिर्चीशी संबंध आहेत. रिंकू देशपांडेने रणजितला 40 कोटी रुपयांची दलाली मिळवून दिली होती. त्याकडे फक्त मुंबईतील वरळी परिसरातील मालमत्तेत कागदावर काही भाडेकरु होते.

रणजितने ईडीला कबूल केलं आहे की लंडनमध्ये इक्बाल मिर्चीशी त्याची बैठक झाली होती. ज्यात तीन मालमत्तांच्या विक्रीबद्दल चर्चा झाली होती. रणजित इकबाल मिर्चीशी सन ब्लींक रियल स्टेट पीव्हीटीचा दलाल म्हणून बोलला होता. रिंकू देशपांडेला मुंबईच्या वरळीच्या मालमत्तेवर बनावट भाडेकरू असल्याच्या बदल्यात चेक देण्यात आल्याची कबुलीही त्याने दिली. रिंकू देशपांडे ही एक मोठी हवाला ऑपरेटर आहे.

इतर बातम्या - नेत्यांनो इथेही लक्ष द्या, निवडणुकीच्या कामांमुळे शेतकऱ्यांचं सगळ्यात नुकसान!

दरम्यान, अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदीनुसार हुमायूं मर्चंटलाही अटक करण्यात आली. इक्बाल मिर्ची उर्फ इक्बाल मेमन हा अंडरवर्ल्डचा दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी होता. हुमायूं मिर्चीचा जवळचा मित्र आणि सहकारी असल्याचे सांगितले जात आहे. सर मोहम्मद यूसुफ ट्रस्टच्या सी व्ह्यू, मरियम लॉज आणि राबिया मॅन्शन या तीन मालमत्तांना बेकायदेशीरपणे हडप करण्यासाठी हुमायूं या व्यापाऱ्याने जाणीवपूर्वक तिथे भाडेकरू ठेवल्याचा आरोप ईडीने केला आहे.

इतर बातम्या - Alert : पुढचे किमान 2 दिवस मुसळधार; 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

काय आहे प्रकरण?

'सीजे हाऊस' या 15 मजली बिल्डिंगचे कंस्ट्रक्शन अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची आणि मेसर्स मिलेनियम डेव्हलपर्सने 2006-07 मध्ये केले होते. 2006-07मध्ये झालेल्या या करारानुसार सीजे हाऊसमध्ये दोन मजले मेमन कुटुंबीयांना देण्यात आली होती. 2007 मध्ये मेसर्स मिलेनियम डेव्हलपर्सने या बिल्डिंगचा तिसरा आणि चौथा मजला इक्बाल मिर्चीच्या नावे ट्रान्सफर करण्यात आला होता. त्याचे क्षेत्रफळ जवळपास 14000 स्क्वैअर फूट होता. या दोन मजल्यांची किमत 200 कोटींच्या जवळपास आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी मिलेनियम कंपनीत शेअरहोल्डर्स आहेत.

इतर बातम्या - मतदानानंतर EVM विरोधात काँग्रेसची नवी मागणी, निवडणूक आयोगाला पाठवलं पत्र!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 08:39 PM IST

ताज्या बातम्या