Home /News /news /

Kolhapur crime : मटणाचा रस्सा वाढताना ताटात सांडला म्हणून थेट चाकू हल्ला; कोल्हापुरातल्या राड्यात एकाचा मृत्यू

Kolhapur crime : मटणाचा रस्सा वाढताना ताटात सांडला म्हणून थेट चाकू हल्ला; कोल्हापुरातल्या राड्यात एकाचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ (shirol) तालुक्यातील शेडशाळमध्ये एका हॉटेलमध्ये रस्सा सांडण्यावरून भांडण झाले या भांडणात दोघांवर चाकू हल्ला करत गंभीर जखमी केले होते.

  कोल्हापूर, 21 मे : कोल्हापूरमध्ये (Kolhapur) कोणत्या कारणावरून भांडणे होतील याचा आपण कधीच अदाज लावू शकत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ (shirol) तालुक्यातील शेडशाळमध्ये एका हॉटेलमध्ये रस्सा ताटात सांडण्यावरून भांडण झाले या भांडणात दोघांवर चाकू हल्ला करत गंभीर जखमी केले होते. दरम्यान यातील एकाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. यामुळे कुरूंदवाड परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी वेळीच सावध होत खबरदारी घेतली आहे. (Kolhapur crime)

  शेडशाळ (ता. शिरोळ) येथील हॉटेल समाधान येथे ताटात रस्सा सांडल्याच्या करणातून वाद होऊन दोघांवर चाकू हल्ला झाला होता. या घटनेत ओंकार माने हा जखमी झाला होता. आज (शनिवारी) सकाळी सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. औरवाड परिसरात तणावपूर्ण वातावरण बनले आहे. दरम्यान पोलिसांनी खबरदारी म्हणून पोलीस तैणात केले आहेत.

  हे ही वाचा : Nashik Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, भरधाव Kia Sonet कार पुलावरुन खाली कोसळली, VIDEO

  या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेले संशयित आरोपी ओंकार शिकलगार, प्रकाश शिकलगार (दोघे रा. शिकलगार वसाहत, कुरुंदवाड ता. शिरोळ) कुलदीप संकपाळ (रा. शेडशाळ ता. शिरोळ) या तिघांवर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

  मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास शेडशाळ (ता. शिरोळ) येथील हॉटेल समाधान ढाबा येथे संशयित आरोपी शिकलगार व संकपाळ हे तिघे जेवत होते. यांच्याशेजारी ओंकार माने व अमीन महंमद पटेल हे जेवत होते. यावेळी एकमेकांचा धक्का लागल्याने बाचाबाची झाली. या घटनेचे रूपांतर शिवीगाळ व हाणामारीत झाले.

  हे ही वाचा : ''जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न..'',लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

  माने व पटेल यांच्यावर संशयित आरोपींनी चाकूने वार करून जखमी केले होते. यातील ओंकारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एकाचा बळी गेल्याने परिरसात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur, Murder

  पुढील बातम्या