नाशिकमध्ये कोरोनाचा पहिला बळी, प्रशासन हादरलं; मालेगावात 5 रुग्ण पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये कोरोनाचा पहिला बळी, प्रशासन हादरलं; मालेगावात 5 रुग्ण पॉझिटिव्ह

मालेगाव शहरात बुधवारी कोरोना विषाणूने एकाचा बळी घेतला आहे. धक्कादायक म्हणजे 5 रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन हादरलं आहे.

  • Share this:

नाशिक, 8 एप्रिल: मालेगाव शहरात बुधवारी कोरोना विषाणूने एकाचा बळी घेतला आहे. धक्कादायक म्हणजे 5 रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन हादरलं आहे. पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आता 7 झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती, मृत व्यक्ती 51 वर्षीय असून तो मालेगावचा रहिवाशी होता. त्याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची दिली आहे. या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासन हादरलं आहे.

हेही वाचा...महापौरांना करायचीय रुग्णसेवा; म्हणाल्या, मी परिचारिकाच, मन स्वस्थ बसू देत नाही

मृत व्यक्ती दोन महिन्यांपूर्वी उमरा-हज यात्रेला जाऊन गेली होती, अशी माहिती समोर आली आहे. सर्व संशयीत रुग्ण मालेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातील विशेष कोरोना कक्षात दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णांचं मरकज कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान,  कोरोना विषाणूने राज्यात अक्षरश: थैमान घातलं आहे. राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 1135 झाला आहे. सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. संपूर्ण राज्यासाठी पुढील 7-8 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे, सगळ्यांनी खबरदारी घ्या, सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करा, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

हेही वाचा..बारामतीत एक वर्षाच्या चिमुरडीला कोरोना, एकाच कुटुंबातील पाच जणांना लागण

राज्यात आज 117 नवीन कोरोनारुग्ण दाखल झाले. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 1135 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 72 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात एका दिवसांत  5 मृत्यू 

पुण्यात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे, तसा मृतांचा आकडाही वाढतो आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. पुण्यात दुपारपर्यंत 5 मृत्यूंची नोंद झाली होती. आणखी 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची बातमी आता आली आहे. त्यामुळे  राज्यात दिवसभरात कोरोनाचे एकूण 9 बळी गेले. हा आतापर्यंतचा मोठा आणि चिंता वाढवणारा आकडा आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 8, 2020, 11:45 PM IST

ताज्या बातम्या