एक दिवस भाजपचे नेते व्हा मग....!, चंद्रकांत पाटील यांची 'नायक' टाईप ऑफर

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी असंच काहीस विधान केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2018 03:27 PM IST

एक दिवस भाजपचे नेते व्हा मग....!, चंद्रकांत पाटील यांची 'नायक' टाईप ऑफर

रत्नागिरी, 08 सप्टेंबर : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी असंच काहीस विधान केलं आहे. यावेळी त्यांनी थेट पत्रकारांनाच ऑफर दिली आहे. 'माझी तुम्हाला ऑफर आहे, तुम्ही एक दिवसाचे भारतीय जनता पार्टीचे नेते व्हा मग तुम्हाला कळेल की हे सरकार चालवणं किती कठीण आहे' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते रत्नागिरीत कणकवलीमध्ये बोलत होते.

चंद्रकांत पाटलांची ही ऑफर ऐकून तुम्हाला अभिनेता अनिल कपूर याचा नायक हा सिनेमा नक्कीच आठवला असेल. त्यातही अमरिश पूरीने अनिल कपूर यांना एक दिवस मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली होती, अगदी त्याचप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना एक दिवस भाजपचे नेते व्हा अशी ऑफर केली आहे.

कोणत्याही निर्णयामध्ये आम्हाला शिवसेना, आरपीआय, महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत या सगळ्यांच्या पक्षाशी समन्वय साधावा लागतो. या सगळ्यांना सांभाळून आम्ही चार वर्ष सरकार चालवलं आहे. तर येणाऱ्या सरकारमध्येही हे सगळे असतील असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

युतीबाबतचा मुद्दा छेडत मी युतीबाबत आजही आग्रही असल्याचं पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, विधानसभा, लोकसभा आणि पदवीधर निवडणूक लढवण्याचा असा कोणताही इरादा नाही असं सांगत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणाच करून टाकली होती. त्यांच्या घोषणेमुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली होती. ते कोल्हापूर इथं झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

तर कालच मी निवडणूक लढवणार नाही, असं वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे राज्याचे दोन नंबरचे मंत्री अर्थातच चंद्रकांत पाटलांनी घूमजाव केलं. मी निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल असं वक्तव्य करत चंद्रकांत पाटलांनी 12 तासात आपली भूमिका बदलली.

Loading...

यापुढे मी निवडणूक लढवणार नसल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांसमोर केलं होतं. ते वक्तव्य प्रसंगाला धरून होतं असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिलं. तसंच ध चा मा केल्याचं म्हणत प्रसारमाध्यमांवरच खापर फोडलं.

 

VIDEO : राम कदमांवर मुख्यमंत्री गप्प का?, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2018 03:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...