मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

COVID-19: कोरोना संशयित तरुणाने संपवलं आयुष्य, रुग्णालयाच्या इमारतीवरुन घेतली उडी

COVID-19: कोरोना संशयित तरुणाने संपवलं आयुष्य, रुग्णालयाच्या इमारतीवरुन घेतली उडी

चरणजित बुधवारी सिडनीहून एअर इंडियाच्या विमानातून परत आले आणि विमानतळावर कोरोना संशयास्पद आढळल्यानंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयात पाठविण्यात आलं.

  • Published by:  Manoj Khandekar

नवी दिल्ली, 19 मार्च : जगभरात कोरोनाच्या फैलावानंतर आता देशातही कोरोनाव्हायरसने हाहाकार माजवला आहे. या रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामान्य नागिरकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात एका कोरोना संशयिताने रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. चरणजित सिंग असं या तरूणाचं नाव असून तो 35 वर्षांचा आहे. चरणजित बुधवारी सिडनीहून एअर इंडियाच्या विमानातून परत आले आणि विमानतळावर कोरोना संशयास्पद आढळल्यानंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयात पाठविण्यात आलं.

एका वर्षापासून सिडनीमध्ये...

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 9 वाजता चरणजितला सफदरजंग रुग्णालयात नेल गेलं. तो मूळचा पंजाबचा असून गेल्या एक वर्षापासून सिडनी इथे राहत होता. त्याला कोरोना झाल्याचा संशय आल्याने थेट विमानतळावरून सफदरजंग इथे पाठविण्यात आलं. पण या सगळ्याचा चरणजित मानसिक त्रास झाला असावा की काय म्हणून त्याने रुग्णालयाच्या इमारतीवरूनच उडी घेत आत्महत्या केली. त्याच्या अशा जाण्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून नागरिकांची भीती आणखी वाढली आहे.

संबंधित - महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांमध्ये पावसानं कहर, गारव्यामुळे कोरोनाची भीती वाढली

कोरोनापासून आतापर्यंत देशात तीन मृत्यू

विशेष म्हणजे, देशात कोरोनामुळे त्रस्त तीन रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हे मृत्यू दिल्ली, कर्नाटक आणि मुंबई येथे झाले. हे सर्व पीडित वृद्ध होते. त्याच वेळी, देशातील कोरोनामुळे 160 हून अधिक लोक त्रस्त असल्याचे आढळले आहे. त्याचबरोबर, जगभरातील आकडेवारीवर नजर टाकल्यास कोरोनामुळे 8 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लाखाहून अधिक लोक या विषाणूच्या चपळ्यात आहेत.

संबंधित - पुणेकरांनो आजपासून जरा जपूनच, जमावबंदीनंतर आता 'हे' 5 निर्णय लागू

First published: