भिवंडी-वाडा मार्गावर पुन्हा अपघात, वाटसरूच्या हात आणि पायावरून गेला टेम्पो

टेम्पो खड्ड्यात आदळून एका वाटसरूच्या हात-पायावरून गेला. या अपघातात 60 वर्षीय व्यक्तीने आपला एक हात आणि पाय गमवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 10:24 PM IST

भिवंडी-वाडा मार्गावर पुन्हा अपघात, वाटसरूच्या हात आणि पायावरून गेला टेम्पो

रवी शिंदे,(प्रतिनिधी)

भिवंडी, 11 ऑक्टोबर: भिवंडी-वाडा मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. या मार्गावरील खड्ड्यांने काल, गुरूवारी एका डॉक्टर तरूणीचा बळी घेतल्याची घटना ताजी असताना पुन्हा अपघात झाला आहे. टेम्पो खड्ड्यात आदळून एका वाटसरूच्या हात-पायावरून गेला. या अपघातात 60 वर्षीय व्यक्तीने आपला एक हात आणि पाय गमवला आहे. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कुडूसजवळ शुक्रवारी हा अपघात झाला. टेम्पो मोठ्या खड्ड्यात आदळल्याने चालकाचा ताबा सुटून रामप्रसाद या वाटसरुच्या हात आणि पायावरून टेम्पोचे चाक गेल्याने त्याचा एक हात आणि पाय निकामी झाला आहे.

लग्नाच्या खरेदीसाठी जात होती तरुणी.. त्याआधीच उद्ध्वस्त झाले स्वप्न

लग्नाची स्वप्न रंगवणाऱ्या आणि लोकांना जीवदान देणाऱ्या डॉक्टर तरुणीवर काळाने घाला घातला. रस्त्यावरील खड्ड्यांनी डॉक्टर असणाऱ्या अवघ्या 23 वर्षीय तरुणीची आयुष्याची स्वप्ने उद्ध्वस्त केली.

भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे तरुणीचा बळी गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. भिवंडी-वाडा रोडवर दुर्गाड फाट्याजवळ दुचाकी खड्ड्यात आदळून डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाली. नेहा आलमगिर शेख ( 23) असे या तरुणीचे नाव होते. नेहाचे पुढच्या महिन्यात लग्न होते. ती लग्नाची खरेदी करण्यासाठी जात होती. नव्या जीवनाची सुरुवात नव्या आशा आणि सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या नेहाबाबत मात्र काळाने घात केला. बोहल्यावर चढण्याआधीच नेहाला खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात जीव गमवावा लागला.

Loading...

लग्नाची खरेदी झाल्यानंतर नेहा ठाण्याहून भिवंडीला निघाली होती. दरम्यान त्याच वेळी दुचाकी अचानक खड्ड्यात आदळल्याने नेहाचा तोल गेला. तिला सावरण्याचा एक क्षणही मिळाला नाही. ती खाली पडली. याच वेळी मागून येत असलेल्या भरधाव ट्रकचे चाक नेहाच्या अंगावरून गेले. नेहाचा जागेवरच मृत्यू झाला.

अभिजीत बिचकुलेनं उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2019 10:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...