दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरेबद्दल मोठा खुलासा

दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरेबद्दल मोठा खुलासा

शरद कळसकर यानं डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची रेकी केली होती

  • Share this:

औरंगाबाद, 01 सप्टेंबर :  डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेल्या सचिन अंदुरेच्या बाबतीत महत्वाचा पुरावा समोर आला आहे. सचिन अंदुरे औरंगाबादेतील ज्या 'प्रीटी सिक्रेट' या दुकानात काम करत होता. त्या दुकानात तो डाॅ. दाभोळकरांच्या हत्येच्या दिवशी गैरहजर असल्याचा पुरावा सीबीआयच्या हाती लागला आहे.

सचिन अंदुरे हा औरंगाबादचा रहिवाशी आहे आणि सीबीआयने त्याला 14 आॅगस्ट रोजी ताब्यात घेतलं. डाॅ. दाभोळकरांची पुण्यात 20 आॅगस्ट 2013 रोजी  डॉ. नरेंद्र दाभोलकर हे सकाळी सात वाजेच्या सुमारास माॅर्निंग वाॅकसाठी गेले होते.  विठ्ठल रामजी शिंदे पुलावर पोहोचले असता तिथे दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर तिथून ते पसार झाले.

ज्या दिवशी दाभोलकर यांची हत्या झाली त्याच दिवशी सचिन अंदुरे 'प्रीटी सिक्रेट' या दकानाच्या हजेरी बुकात गैरहजर असल्याची नोंद आढळून आली आहे. सचिन 19 आॅगस्ट रोजी सुद्धा साप्ताहिक सुट्टीवर होता. त्यामुळे सचिन अंदुरे 19 आणि 20 आॅगस्ट रोजी कुठे गेला होता हा सवाल उपस्थित झाला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर 19 आॅगस्ट रोजी रात्री करा वाजता औरंगाबादहून पिस्टलसहित पुण्याला रवाना झाले. पहाटे ते पुण्याला पोहचले आणि  विठ्ठल रामजी शिंदे पुलावर या दोघांनी डॅा.दाभोळकरावर गोळ्या झाडून हत्या केली.

दरम्यान, औरंगाबादमध्ये शरद कळसकरच्या घराची झडती घेण्यात आली. कळसकर औरंगाबाद जवळील केसापुरी गावचा रहिवाशी आहे. शरद कळसकर याचा डॉ दाभोलकर यांच्या हत्येत सहभागही असल्याचा आरोप असू तो सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे.

काल 31 आॅगस्ट रोजी  सीबीआयने सचिन अंदुरेला विठ्ठल रामजी शिंदे पुलावर नेऊन प्रत्यक्ष घटना कशी घडली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याच विठ्ठल रामजी पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.

सचिन अंदुरेला साडेतीन वाजता या पुलावर नेण्यात आलं. दाभोलकरांवर गोळ्या कुठून झाडल्या, त्यांना मारण्यासाठी ते कोणत्या दिशेने आले, कसे निघून गेले या सगळ्याची माहिती विचारण्यात आली. आणि पंचनाम्याद्वारे माहिती लिहूनही घेण्यात आली. सीबीआयचा, तपासाची पुढची बाजु पक्की करण्याचा हा प्रयत्न आहे.

 

कशी झाली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या?

शरद कळसकर यानं डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची रेकी केली होती. तेव्हा कोणत्या वेळेस कुठे जातात? कोणाला भेटतात? कोणत्या वेळेस एकटे असतात? कोणत्या वेळेस त्यांच्या आजूबाजूला कोण नसतं? या सर्वाची रेकी शरद कळसकर यानं केली होती. याच रेकीच्या आधारे शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनी पहिल्यांदा डाॅक्टर नरेंद्र दाभोलकरांना मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न फसला.

त्यानंतर २० आॅगस्ट २०१३ ला सकाळी डॉ.नरेंद्र दाभोलकर शनिवार पेठेत बालंगधर्व रंगमदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणार्‍या पुलावरून जात होते. तेव्हा सात वाजून 20 मिनिटांच्या सुमाराला त्यांच्या दिशेने बाईक चालवत शरद कळसकर आला होता आणि त्याच्या मागे बसला होता तो सचिन अंदुरे... याच सचिन अंदुरेने नरेंद्र दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या आणि पळून गेले.

पुढे जाऊन त्यांनी ठरल्या प्रमाणे या हत्येत वापरलेली बाईक, पिस्तूल आणि कपडे हे नष्ट करण्यासाठी दिले की यांनीच ते नष्ट केले याचा तपास आता एटीएस आणि सीबीआय करत आहेत.

 

दाभोलकरांच्या हत्येला ५ वर्षे लोटली, तरी या ५ प्रश्नांची उत्तरं अजूनही सापडली नाहीत

First published: September 1, 2018, 8:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading