मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती का?

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती का?

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या नियुक्तीला विरोध करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. आणि त्याच कारण ही तसंच आहे.

पुणे, 12 ऑगस्ट : राज्य सरकारच्या पोलीस ट्रॅब्युनल अर्थात पोलीस प्राधिकरणावर गृह विभागाने केलेल्या राजकुमार ढाकणे यांच्या नियुक्तीवर मोठा वादंग उठला आहे. अगदी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या नियुक्तीला विरोध करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. आणि त्याच कारण ही तसंच आहे. पोलीस खात्यातील अंतर्गत कज्जे सोडवण्याचं काम करत असलेल्या आणि सत्र न्यायालया इतके अधिकार असलेल्या या पदावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पुण्यातल्या राजकुमार ढाकणे या व्यक्तीची नेमणुक करण्यात आली आहे. कोण आहे हा राजकुमार ढाकणे? - राजकुमार ढाकणेचा सिक्युरिटी पुरवण्याचा व्यवसाय - पुण्यातल्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या सिक्युरिटी गार्डने कामाचे पूर्ण पैसे मागितल्यावर त्याच्या डोक्यात लायसन्स रिव्हाॅल्वरचा दस्ता मारून त्याला गंभीर जखमी केलं होतं. याप्रकरणी 2015मध्ये दाखल गुन्ह्याची न्यायालयात सुनावणी सुरू - याच प्रकरणात ढाकणे अटक असताना ही पळून गेल्याचा दुसरा गुन्हा ही दाखल (2015) - कोरेगाव पार्क पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई सुध्दा करण्यात आली होती (2016) - जागेत अतिक्रमण करून कट करून फसवणुक केल्याचा गुन्हा (2017) - पुणे महापालिकेचे अतिक्रमण कारवाईला विरोध केल्याचे दोन गुन्हे - फिनिक्स मॉलमध्ये बेकायदा घुसून दंगल माजवल्याचा गुन्हा विमानतळ पोलीस ठाणे (2014) - रूबी हास्पिटलचे डॉक्टर सदरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार - राजकुमार ढाकणे यांच्या डीआर एन्टरप्रायजेसकडे असलेल्या खारगर टोल नाक्याच्या वसूलीचा 10 कोटीचा महसूल बुडाल्याने पोलीस बंदोबस्तात हा टोल त्यांच्याकडून एप्रिल 2019मध्ये काढून घेऊन एमएसआरडीसीकडे देण्यात आला आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Pune, Pune news

पुढील बातम्या