काँग्रेसच्या अडचणीत वाढ; पुलवामावरून अमित शहांचा राहुल गाधींवर मोठा हल्ला

काँग्रेसच्या अडचणीत वाढ; पुलवामावरून अमित शहांचा राहुल गाधींवर मोठा हल्ला

राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी अमित शहा यांनी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मार्च : सॅम पित्रोदा यांनी केलेल्या विधानावरून आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांनी पुलवामा हल्ला सामान्य हल्ला होता का? हे स्पष्ट करावं. यावर उत्तर द्यावं. तसेच  दहशतवादी हल्ल्यांशी पाकिस्तानचा संबंध आहे की नाही?  दहशतवाद्यांना एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईकनं उत्तर न देता त्यांच्याशी संवाद साधावा हीच तुमची रणनिती आहे का? असा सवाल यावेळी अमित शहा यांनी करत त्यांनी राहुल गांधी यांनी देशातील जनतेची, लष्कराची आणि तरूणांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.


काय म्हणाले होते सॅम पित्रोदा?

'मला हल्ल्यांबाबत जास्त काही माहीत नाही. पण, हल्ले होत राहतात. मुंबईवर देखील हल्ला झाला होता. त्यावेळी देखील एअर स्ट्राईक करता आला असता. पण, ते चुकीचं होतं. माझ्या मताप्रमाणे जगात वागण्याची ही पद्धत बरोबर नाही. 'काही लोक येतात आणि हल्ला करतात. त्यासाठी आपण संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार कसं ठरवणार?' असा सवाल यावेळी सॅम पित्रोदा यांनी केला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच यावेळी त्यांनी 'एअर स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी ठार झाले म्हणता. त्याला पुरावा काय?' असा सवाल केला होता.यावरून आता भाजप - काँग्रेस आमने- सामने आल्याचं पाहायाला मिळत आहे.


VIDEO: 'शिवज्योत' घेऊन धावले अमोल कोल्हे; म्हणाले.. 'हा जोश असाच टिकणार'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 01:29 PM IST

ताज्या बातम्या