S M L

13 जूनला राज्यभर रेलरोको करणार, राजू शेट्टींची घोषणा

शेतकऱ्यांचं आंदोलन मोडणाऱ्यांमध्ये आमच्या स्वाभिमानीचा एक गद्दार आहे. लवकरच या गद्दाराचा फैसला करू अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांचं नाव न घेता केली.

Sachin Salve | Updated On: Jun 8, 2017 04:53 PM IST

13 जूनला राज्यभर रेलरोको करणार, राजू शेट्टींची घोषणा

08 जून : शेतकऱ्यांचं आंदोलन मोडणाऱ्यांमध्ये आमच्या स्वाभिमानीचा एक गद्दार आहे. लवकरच या गद्दाराचा फैसला करू अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांचं नाव न घेता केली. तसंच 13 जूनला आक्रमक रेल्वे रोको आंदोलन करणार अशी घोषणाही शेट्टींनी केली. तसंच सरकारसोबत समन्वय समिती चर्चा करायला तयार आहे असंही  राजू शेट्टी म्हणाले.

नाशिकमध्ये सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सत्तेत सहभागावरुन राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या सहभागावरुन गोंधळ उडाला होता. पण, या गोंधळानंतर पुढील कार्यक्रम पार पडलाय. बच्चू कडू, भाई जगताप आणि राजू शेट्टी यांची भाषण झाली. यावेळी तिन्ही नेत्यांनी  फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.

मर जवान,मर किसान अशी देशात परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आंदोलन अधिक आक्रमक करण्यात येणार येईल. 12 जूनला प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि 13 जूनला अत्यंत आक्रमक रेलरोको करून या आंदोलनाची धर दिल्लीपर्यंत धग पोहचवणार असं राजू शेट्टींनी जाहीर केलं.यांना मतं द्या म्हणून गावोगावी फिरलो याचा मला आता पश्चाताप होतोय. सदाभाऊ हा तर स्वाभिमानीचा गद्दार आहे. लवकरच त्याला त्याची जागा दाखवू असा हल्लाबोल राजू शेट्टींनी केला.

तसंच तुमच्यात दम असेल तर पहिली कुंडली माझी काढा असं आव्हानच राजू शेट्टींनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलं.

तर या सरकारने शेतकऱ्यांवर दरोडा टाकला  आणि दरोड्याचे गुन्हे आमच्यावर टाकले. चुकीचे गुन्हे टाकले तर नक्की दरोडा टाकू असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला. तसंच हात छाटण्याची वेळ आमच्यावर आणू नका. जात,पात, धर्म फक्त शेतकरी एवढंच डोक्यात ठेवा. आता शेतकऱ्याचा कट्टरवाद सुरू होणार असा इशाराही त्यांनी दिला. आमच्या डोक्यात सत्तेची लालसा नाही जर असती तर सदाभाऊंच्या जागी राजू शेट्टी असते अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 8, 2017 04:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close