नवी दिल्ली, 9 डिसेंबर : ब्रिटनमध्ये राहणारं एक जोडपं लॉटरीमध्ये मोठी रक्कम जिंकलं आहे. या जोडप्याने चक्क 1130 कोटींची लॉटरी जिंकली. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की इतके कोटी जिंकूनही या जोडप्याने स्वत:साठी सेकंड हँड कार खरेदी केली. त्यांच्या मुलीसुद्धा सेकंड हँण्ड गाड्या वापरतात. लॉटरी जिंकल्यानंतर फ्रान्सिस कोनोलीने आपल्या 50 मित्र आणि नातेवाईकांना मदत करण्याचा निर्णय घेतला.
तब्बल 600 कोटी रुपये वाटले.
लॉटरीच्या पैशातून त्यांनी सुमारे 175 कुटुंबांना मदत केली. फ्रान्सिसमुळे, त्याच्या बर्याच मित्रांना नवीन घर विकत घेता आले आणि बर्याच लोकांनी त्यांच्यावरील खर्चही फेडले. द सनच्या अहवालानुसार लॉटरी जिंकल्यानंतर सुमारे 2 वर्षानंतर फ्रान्सिसने आता लोकांना मदत म्हणून अर्ध्याहून अधिक रक्कम (सुमारे 600 कोटी रुपये) दिली असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, सर्वाधिक आनंद याचा आहे की ज्यांना पैसे दिले त्यांनीही दुसऱ्यांची मदत केली.
स्वत:साठी सेकँड हँड गाडी खरेदी केली
फ्रान्सिस आणि तिचा नवरा पॅट्रिक यांनी ब्रिटनच्या द नॅशनल लॉटरीच्या युरो मिलियन प्रोग्राम अंतर्गत मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले होते. जानेवारी 2019 मध्ये या जोडप्याला विजेता बनविण्यात आलं होतं. तेव्हा 25 वर्षांच्या इतिहासातील लॉटरीमध्ये जिंकलेली ही चौथी सर्वाधिक रक्कम होती. 54 वर्षांची फ्रान्सिस म्हणते की, दागिने खरेदी करण्यापेक्षाही इतरांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून जास्त आनंद झाला. त्याच वेळी, गेल्या वर्षी पॅट्रिकने फ्रान्सिससाठी 2 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत सेकंड-हँड जग्वार विकत घेतली होती.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.