राज्यात उष्मघाताचा दुसरा बळी, धुळ्यातील माजी सरपंचचा मृत्यू

राज्यात उष्मघाताचा दुसरा बळी, धुळ्यातील माजी सरपंचचा मृत्यू

बाभुळदे गावात राहणाऱ्या 49वर्षीय माजी माहिला सरपंच मालती निकुंभे याचा उष्मघाताने मृत्यू झाला.

  • Share this:

30 मार्च :  धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात उष्माघातामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बाभुळदे गावात राहणाऱ्या 49वर्षीय माजी माहिला सरपंच मालती निकुंभे याचा उष्मघाताने मृत्यू झाला. दरम्यान, काल बीडमध्ये राज्यातील उष्मघाताचा पहिला बळी गेला होता. त्यानंतर धुळ्यात उष्मघाताने महिलेचा मृत्यू झाला.

धुळे जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्याने ४० पार केली आहे. धुळे जिल्ह्यात आज 43.04 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले असून, जिल्ह्यातील यंदाच्या तापमानातील हा उच्चांक ठरला आहे. हवेतील आर्द्रता कमालीची घटल्याने उकाडा वाढला आहे. या असह्य होणाऱ्या उकाड्यापासून सुटका कशी मिळवायची, अशी चिंता प्रत्येकाला लागली आहे. एरवी एप्रिल अखेर तापमानाचा पार चाळीशी पार करत असताना या वर्षी मात्र धुळे जिल्ह्यात तापमान मार्च महिन्यातच प्रचंड वाढलं आहे. सूर्य आग ओतू लागल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याला सामोरं जावं लागत आहे.

धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचला आहे. किमान तापमानही 24.2 अंशांपर्यंत आहे. त्यामुळे रात्रीही उकाडा वाढला आहे. उष्णतेची दाह इतकी  वाढलीये की डोक्यावर सकाळी १० वाजेपासून रुमाल बांधून नागरीक घराबाहेर पडतांना दिसताहेत. त्यामुळे या वाढत्या तापमानाचा आता सर्वांना त्रास होऊ लागला आहे.

राज्याचे तापमान

मुंबई - 32

नाशिक - 40

जळगाव - 43

नागपूर - 42

औरंगाबाद - 41

पुणे - 40

रत्नागिरी - 32

कोल्हापूर - 37

सिंधुदुर्ग - 35

सोलापूर - 40

First published: March 30, 2017, 12:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading