विदर्भात वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या, 7 दिवस मृतदेह झाडाला होता लटकलेला!

विदर्भात वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या, 7 दिवस मृतदेह झाडाला होता लटकलेला!

नापिकी, कर्जबाजीरीपणाला कंटाळून अकोल्यातील पातूर तालुक्याच्या पिंपलडोळी येथील आदिवासी वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केली.

  • Share this:

कुंदन जाधव, प्रतिनिधी

अकोला, 19 नोव्हेंबर : नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ६२ वर्षीय वृद्ध आदिवासी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना अकोल्यात घडली आहे. तुळशीराम नामदेव शिंदे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांचा मृतदेह सात दिवस झाडाला लटकलेला होता.

नापिकी, कर्जबाजीरीपणाला कंटाळून अकोल्यातील पातूर तालुक्याच्या पिंपलडोळी येथील आदिवासी वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केली. यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या तोंडातील घास पळवला, पावसामुळे हातात आलेलं पीक गेलं. शेती कसण्यासाठी शेतकऱ्यांनी आधीच कर्ज असताना, पुन्हा कर्ज काढून शेती केली. सुरुवातीला पीक चांगल बहरला होतं. मात्र, ऐन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेलं पीक हिरावून घेतलं. त्यात महाराष्ट्रात सरकारचा तिढा अजून कायम आहे.

अकोल्याच्या पातूर तालुक्यातील पिंपलडोळी येथी वृद्ध आदिवासी शेतकरी तुळशीराम नामदेव शिंदे यांनी गळफास लावून आत्महत्या केली. तुळशीराम यांच्याकडील ४ एकर शेतात सोयाबीनचे पिक होते. परंतु, सततच्या पावसामुळे सोयाबीनचे पिक जमीनदोस्त झाले. त्यामुळे पेरणीचा खर्च सुद्धा निघाला नाही परिणामी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. त्यात बँकेच्या कर्जाचे ओझे सुद्धा होते. या विवंचनेतून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं आहे.

१३ नोव्हेंबर रोजी तुळशीराम शिंदे कुणालाही न सांगता घरातून निघून गेले. गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली. आज १९ नोव्हेंबर रोजी वनपरिक्षेत्र आलेगांव अंतर्गत असलेल्या नवेगाव वनविभागाच्या जंगलामध्ये तुळशीराम यांनी निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचं समोर आलं. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून त्यांनी पंचनामा करुन सात दिवसांपासून झाडाला लटकलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात पाठवला आहे. तुळशीराम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

यवतमाळमध्ये मागील आठवड्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

दरम्यान, मागील आठवड्यात शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यात नापिकीमुळे दोन शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवली होती. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. मुडाना इथं मोहन राठोड आणि दातोडी इथं साष्टांग गावंडे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या दोन्ही शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन आणि कापसाचे पिकाचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले होते.

============================

Published by: sachin Salve
First published: November 19, 2019, 5:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading